Singer Death: प्रसिद्ध गायकाचं निधन, हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू, 38व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Haryanvi Folk Artist: 38 व्या वयात प्रसिद्ध सिंगर पेप्सी शर्मा यांचं निधन झालं आहे.

Singer Pepsi Sharma Dies: हरियाणवी लोक गायक (Singer Death) आणि प्रसिद्ध रागनी कलाकार पेप्सी शर्मा (Pepsi Sharma) यांनी जगाचा निरोप घेतला आहे. वयाच्या 38व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पेप्सी शर्मा यांच्या कुटुंबाने दिलेल्या माहितीनुसार, हृदयविकाराच्या झटक्यानं (Heart Attack Death) त्यांचे निधन झाले आहे. कुटुंबाने सांगितले की, त्यांना अचानक छातीत दुखू लागलं. त्रासानंतर (Entertainment) त्यांना एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. जिथे उपचारादरम्यान, त्यांचे निधन झाले. पेप्सी शर्मा यांचं खरं नाव यशपाल शर्मा आहे. ते आपल्या स्टेज नावाने खूप प्रसिद्ध होते.
38व्या वयात प्रसिद्ध गायकाचे निधन झाले आहे (Pepsi Sharma Passes Away At 38)
पेप्सी शर्मा हे गाझियाबाद येथील पटला गावातील रहिवासी होते. त्यांनी आपल्या कारकिर्दीत हरियाणा, उत्तर प्रदेश आणि दिल्ली या भागांमध्ये स्टेज परफॉर्मेंस करुन लोकप्रियता मिळवली. दरम्यान, सिंगर पेप्सी शर्मा यांच्या निधनानंतर चाहत्यांकडूनही शोक व्यक्त केला जात आहे. तसेच राजकीय पक्षातील नेत्यांनीही त्यांना श्रद्धांजली वाहिली.
राष्ट्रीय लोक दलाने श्रद्धांजली वाहणारी पोस्ट शेअर केली आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं की, 'आपल्या रागनी या कलेतून लोकांच्या मनात स्थान निर्माण करणारे प्रसिद्ध रागनी गायक पेप्सी शर्मा यांचं निधन झालं आहे. त्यांच्या निधनाची बातमी अत्यंत दु:खद आहे. राष्ट्रीय लोक दलाच्या परिवाराकडून त्यांना श्रद्धांजली. आम्ही या कठीण काळात त्यांच्या कुटुंबाला आणि चाहत्यांना संवेदना व्यक्त करतो'.
पेप्सी शर्मा यांच्या निधाननंतर संगीत विश्वावर शोककळा (Pepsi Sharma )
पेप्सी शर्मा यांनी आपल्या कारकिर्दीत प्रसिद्ध हरियाणवी कलाकार सपना चौधरीसोबत स्टेज शेअर केला होता. त्यांची सर्वात लोकप्रिय सादरीकरणांपैकी नागिन डान्स अॅक्ट होते. त्यांनी आपल्या डान्समधून प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले. पेप्सी शर्मा यांना 10 वर्षांची मुलगी आणि 7 वर्षांचा मुलगा आहे. त्यांच्या निधनानंतर हरियाणवी एंटरटेनमेंट इंडस्ट्रीमध्ये शोक व्यक्त केला जात आहे. पेप्सी शर्मा यांच्या निधनानंतर त्यांच्या दोन्ही मुलांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या:
लग्नाच्या 6 महिन्यांतच गुडन्यूज? सूरज चव्हाण बाबा होणार? जान्हवीच्या VIDEOत संजनाचा बेबी बंप दिसला






















