Hari Hara Veera Mallu Box Office Collection Day 4 : पवन कल्याण आणि बॉबी देओल यांचा 'हरि हर वीरमल्लू' हा सिनेमा प्रदर्शित होऊन आज 4 दिवस झाले आहेत. 24 जुलै रोजी प्रदर्शित झालेल्या या सिनेमाबाबत सुरुवातीला प्रेक्षकांमध्ये उत्सुकता होती आणि त्याचा परिणाम ओपनिंग दिवशी पाहायला मिळाला. मात्र, आठवड्याच्या शेवटीसुद्धा सिनेमाच्या कमाईत मोठी घसरण झाली आहे. सुमारे 250 कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या सिनेमाला हिंदी प्रेक्षकांकडून म्हणावा असा प्रतिसाद मिळालेला नाही.  त्यामागचं कारण म्हणजे, प्रेक्षकांकडे आधीच ब्लॉकबस्टर 'सैयारा' आणि मार्व्हलची सुपरहिरो फिल्म 'द फँटास्टिक फोर – फर्स्ट स्टेप्स' हे पर्याय होते. बॉबी देओल यांची उपस्थिती असूनही प्रेक्षक मोठ्या प्रमाणावर थिएटरमध्ये फिरकले नाहीत.

Continues below advertisement


'हरि हर वीरमल्लु'ची बॉक्स ऑफिस कमाई


पेड प्रीव्यूद्वारे 12.75 कोटींची कमाई केल्यानंतर, सिनेमाने पहिल्याच दिवशी तब्बल 34.75 कोटींची कमाई केली. मात्र दुसऱ्या दिवशी ही कमाई घसरून 8 कोटींवर आली आणि तिसऱ्या दिवशी थोडी वाढ होऊन 9.15 कोटींवर पोहोचली. चौथ्या दिवशी संध्याकाळी 6:40 पर्यंत सिनेमाने 7.56 कोटींची कमाई करत एकूण गल्ला 73.21 कोटींपर्यंत नेला. मात्र, हे आकडे सध्या सैक्निल्कवर उपलब्ध असून, हे अंतिम नाहीत. यामध्ये बदल होऊ शकतो.


हिंदी प्रेक्षकांनी 'हरि हर वीरमल्लू' नाकारला


या सिनेमाची हिंदी आवृत्ती मात्र अत्यंत कमकुवत ठरली. पहिल्या दिवशी हिंदीमध्ये केवळ 1 लाख रुपयांची कमाई झाली. दुसऱ्या दिवशी ती थोडी वाढली, पण केवळ 18 लाखांपर्यंतच पोहोचली. तिसऱ्या दिवशी कमाई पुन्हा घसरून केवळ 5 लाखांवर आली.


सैक्निल्कवरील डेटानुसार, सिनेमाच्या एकूण कमाईतून बहुतांश उत्पन्न तेलुगूपासूनच आलं आहे. तमिळ, मल्याळम आणि कन्नडमध्येही हा सिनेमा एका दिवसात 5 लाखांपेक्षा अधिक कमावू शकला नाही.


'सैयारा'मुळे 'हरि हर वीरमल्लु'चं नुकसान


बॉबी देओल आणि पवन कल्याण यांसारखे मोठे स्टार्स असूनही, या सिनेमाकडून हिंदीमध्ये KGF किंवा पुष्पा २ सारखी कमाई होईल अशी अपेक्षा होती. मात्र, अहान पांडे आणि अनीत पड्डा यांच्या 'सैयारा' सिनेमाने ही संधी हिरावून घेतली. नव्या चेहऱ्यांनी अशा अभिनेत्यांचा सिनेमा मागे टाकला, ज्यांचं करिअर 30 वर्षांहून अधिक काळ सुरुच आहे. लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे, बॉबी देओलने 1995 साली 'बरसात' तर पवन कल्याणने 1996 मध्ये 'अक्कड अम्मई इक्कड अब्बई' या चित्रपटातून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली होती.




इतर महत्त्वाच्या बातम्या 


4 तास 19 मिनीटांच्या सिनेमात 33 अभिनेते, पण चित्रपट फ्लॉप ठरला अन् अनेक कलाकारांचं करियर बरबाद झालं