Natasa-Elvish Yadav Video : भारतीय ऑल राऊंडर क्रिकेटपटू हार्दिक पांड्याची एक्स-वाईफ नताशा स्टॅनकोव्हिक नेहमीच कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. वाढदिवसाच्या दिवशी हार्दिक पांड्या एकटाचा सेलिब्रेशन करताना दिसला, तर त्याची Ex-वाईफ नताशाचा यूट्यूबरसोबत समुद्रकिनारी फिरतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. नताशाचे फोटो आणि व्हिडीओ नेहमीच व्हायरल होत असतात. आता नताशा वेगळ्या कारणामुळे चर्चेत आली आहे. नताशा आता यूट्यूबरसोबत समुद्रकिनारी फिरतानाचा व्हिडीओ समोर आला आहे. यूट्यूबर आणि बिग बॉस ओटीटी सीझन 2'चा विजेता एल्विश यादव याच्यासोबतचा नताशाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.


एल्विश यादवसोबत दिसली हार्दिक पांड्याची एक्स-वाईफ


एल्विश यादवने त्याच्या सोशल मीडिया हँडलवर क्रिकेटर हार्दिक पांड्याची पूर्वाश्रमीची पत्नी नताशा स्टॅनकोव्हिकसोबतचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर सर्वांनाच धक्का बसला. व्हिडीओमध्ये हे दोघे जण नताशाच्या 'तेरे करके' या नवीन गाण्यावर व्हिडीओ बनवताना दिसत आहेत. नताशा आणि एल्विश एकमेकांच्या डोळ्यात हरवले दिसत आहेत. या व्हिडीओमध्ये त्यांची केमिस्ट्रीही दिसत आहे. हे पाहून चाहत्यांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.


नताशा स्टॅनकोव्हिकचा समुद्रकिनारी फिरतानाचा VIDEO व्हायरल


आपल्या इंस्टाग्राम हँडलवर व्हिडीओ शेअर करताना, एल्विश यादवने लिहिलंय, Vibin' On A Whole New Level " व्हायरल व्हिडीओमध्ये, नताशा फ्लोरल प्रिंटेड ड्रेस फार सुंदर दिसत आहे, तर एल्विश यादवने स्टायलिश सिल्व्हर जॅकेटसह काळ्या रंगाचा टी-शर्ट घातला आहे. दोघेही सुंदर समुद्रकिनारी फिरताना दिसत आहेत. या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा पाऊस पाडला आहे.


तुम्ही व्हिडीओ पाहिला का?






घटस्फोटानंतर नताशाचं कमबॅक


हार्दिक पांड्या आणि नताशा स्टॅनकोव्हिक यांचा घटस्फोट झाला आहे. चार वर्ष संसार केल्यानंतर हार्दिक आणि नताशा विभक्त झाले. दोघांना एक मुलगा आहे. घटस्फोटानंतर मॉडेल नताशा तिच्या कामावर लक्ष केंद्रीत करताना दिसत आहे. नताशा 'तेरे करके' या पंजाबी म्युझिक व्हिडीओमधून कमबॅक केलं आहे. घटस्फोटानंतर नताशाचा हा पहिल्या प्रोजेक्ट आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Ankita Walawalkar Dating : ‘या’ लोकप्रिय कलाकाराला डेट करतेय 'बिग बॉस' फेम अंकिता, 'कोकण हार्टेड गर्ल'चा 'कोकण हार्टेड बॉय' कोण? जाणून घ्या