Hardik Pandya Credits Girlfriend Mahieka Sharma: टीम इंडियानं (Team India) टी20 विश्वचषकात (T20 World Cup) न्यूझीलंडचा (IND vs NZ) धुव्वा उडवून तिसऱ्यांदा वर्ल्डकप ट्रॉफीवर आपलं नाव कोरलंय. गुजरातच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर टीम इंडियाच्या धुरंधरांनी इतिहास रचला आणि देशाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला. संजू सॅमसन, ईशान किशन, जसप्रीत बुमराह आणि अभिषेक शर्मा यांच्या आउटस्टँडिंग परफॉर्मन्सनं प्रेक्षकांची मनं जिंकली. तप, स्टेडियमवर उपस्थित असलेले माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी आणि रोहित शर्मा यांच्यावरही सर्वांच्या नजरा खिळल्या. पण, या सामन्यात खरी लाईमलाईट चोरली ती, हार्दिक पांड्या (Hardik Pandya) आणि त्याची गर्लफ्रेंड माहिका शर्मा (Mahieka Sharma) हिनं. फायनलचा सामना जिंकल्यानंतर हार्दिक आणि माहिका एकमेकांच्या मिठीत पाहायला मिळाले. तर, हार्दिकनं सर्वांसमोर माहिकाच्या गालावर किस केलं. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पण, हार्दिक पांड्यानं माहिकासोबत केवळ आनंद साजरा केला नाहीतर, विजयाचं श्रेयही त्याला दिलं. तसेच, हार्दिकनं यावेळी बोलताना तिचा पत्नी म्हणून उल्लेखही केला. ज्यामुळे सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. 

हार्दिककडून गर्लफ्रेंड माहिका शर्माला क्रेडीट

बॉलिवूड शादीसनं दिलेल्या माहितीनुसार, हार्दिक पांड्यानं सामन्यानंतर एका मुलाखतीत म्हटलं की, मी सुरुवातीपासूनच म्हणत होतो की, आम्ही जिंकणार आहोत. मला माहीत होतं की, आम्हीच चॅम्पियन आहोत आणि आम्हीच या ट्रॉफीसोबत परतणार आहोत. मी माहिकालासुद्धा हेच सांगितलेलं की, अजिबात चिंता करू नकोस, आपणच जिंकणार... मला टीमसोबत पुढची आणखी दहा वर्ष खेळायचंय... आणि 10 टायटल जिंकायचेत... आणि मला खरंच एक गोष्ट सांगायचीय, जेव्हापासून माहिका माझ्या आयुष्यात आलीय, प्रत्येक गोष्ट चांगली घडतेय... मी सतत विजयाची पायरी चढतोय. 

माहिका शर्मानंही इंस्टाग्रामवर हार्दिक पांड्या आणि टीम इंडियाला टी20 वर्ल्डकप जिंकल्याच्या शुभेच्छा दिल्या. यासंदर्भात तिनं इन्स्टाग्राम स्टोरीवर क्रिकेटरचा एक फोटो शेअर करत लिहिलंय की, द मैन, द मिथ, द लेजंड...

माहिका शर्मा एक मॉडल आणि अभिनेत्री आहे. माहिका शर्मा इंस्टाग्रामवर फॅशन आणि फिटनेस कंटेंट शेअर करत असते. माहिका शर्मानं तिचे शालेय शिक्षण दिल्लीत पूर्ण केलंय आणि नंतर अर्थशास्त्र आणि वित्त शिक्षण घेतलंय. माहिकाने अनेक इंटर्नशिप केल्या, ज्यामुळे तिला मॉडेलिंग आणि अभिनय करायला सुरुवात झाली. माहिका अनेक ब्रँडच्या जाहिरातींमध्येही दिसली आहे. माहिकाने तरुण ताहिलियानी, मनीष मल्होत्रा, अनिता डोंगरे, रितू कुमार आणि अमित अग्रवाल यांच्यासह अनेक प्रसिद्ध फॅशन डिझायनर्ससाठी रॅम्पवर उतरलीय. 24 वर्षांच्या माहिका शर्माला 2024 च्या इंडियन फॅशन अवॉर्ड्समध्ये मॉडेल ऑफ द इयर (न्यू एज) पुरस्कार देखील मिळाला आहे.

नताशासोबतच्या घटस्फोटानंतर माहिकासोबत जुळलं सूत

हार्दिक पंड्या टीम इंडियाचा अष्टपैलू धुरंधर. मैदानातल्या त्याच्या धुवांधार खेळीसाठी हार्दिक जेवढा चर्चेत असतो, तेवढाच तो त्याच्या वैयक्तिक आयुष्यासाठीही ओळखला जातो. हार्दिकनं 2020 मध्ये अभिनेत्री नताशा स्टॅनकोविकशी लग्न केलं. या जोडप्याला एक मुलगा आहे. 2024 मध्ये दोघांनी परस्पर सहमतीनं वेगळं होण्याचा निर्णय घेतला. तेव्हापासून हार्दिक पांड्या माहिका शर्माला डेट करतोय. 

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Hardik Pandya-Mahika Sharma T20 World Cup 2026: मिठी मारली, मैदानात हार्दिक पांड्यासोबत नाचली...; पुढे महिकाने जे केलं संपूर्ण ग्राऊंड स्टाफ बघत बसलं, पाहा PHOTO