Hansika Motwani: 2022 मध्ये जयपूरमध्ये थाटामाटात लग्न करणारी अभिनेत्री हंसिका मोटवानी (Hansika Motwani) पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. लग्नानंतर काही महिन्यांतच तिच्या आणि पती सोहेल खतुरिया यांच्यात मतभेद सुरू असल्याच्या अफवा जोरात पसरल्या होत्या. इतकंच नव्हे तर, त्यांच्या नात्यात आता ‘ब्रेकअप’ची चाहूल लागल्याचं बोललं जातंय. आणि अशातच हंसिकेने एक असं पाऊल उचललंय, ज्याने सगळ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत!

Continues below advertisement

हंसिकानं आडनावात केला बदल 

होय! अभिनेत्रीने तिचं इंस्टाग्रामवरील आडनाव बदललं आहे. आधी ती Hansika Motwani म्हणून ओळखली जायची, पण आता तिचं नाव Hansika Motwanni असं झळकतंय. एवढ्या छोट्या स्पेलिंग बदलामुळे सगळ्यांच्या नजरा तिच्याकडे वळल्या.  तिने केलेल्या या बदलाकडे चाहत्यांचं लख गेलं.  हा तिच्या नात्यातील बदलाचा इशारा आहे का, की फक्त अंकशास्त्राचा खेळ हा प्रश्न सध्या सगळ्यांना पडला आहे.

 

Continues below advertisement

सेलेब्सचा ‘स्पेलिंग मंत्र’

बॉलिवूडमध्ये नाव बदलणं आता नवं राहिलेलं नाही. राजकुमार राव, आयुष्मान खुराना, अशा अनेक कलाकारांनी करिअरच्या टर्निंग पॉइंटवर आपल्या नावात बदल केला आणि मोठं यश मिळवलं. त्यामुळे हंसिकेचा हा बदलही लकी चार्म ठरणार का, याची चर्चा रंगली आहे.

बालकलाकार ते ग्लॅमडॉल

हंसिकाचा प्रवासही तितकाच रंगीबेरंगी राहिला आहे. शाका लाका बूम बूममधून करिअरला सुरुवात करून तिने कोई मिल गयामध्ये छोटं पण लक्षवेधी काम केलं. त्यानंतर ‘देसमुदुरु’ या अल्लू अर्जुनसोबतच्या चित्रपटातून तिने साऊथमध्ये धडक दिली आणि लोकप्रियता मिळवली.

प्रेम, लग्न आणि वाद

डिसेंबर 2022 मध्ये जयपूरमधील तिचं लग्न म्हणजे बॉलिवूडचा हॉट टॉपिक ठरलं होतं. ‘लव्ह शादी और ड्रामा’ या डॉक्युमेंटरीत त्यांच्या लग्नाचे क्षण दाखवले गेले, जे Jio Hotstar वर प्रदर्शित झाले. पण या प्रेमकथेभोवती एक वाद कायम होता – कारण, सोहेल आधी हंसिकेच्या मैत्रिणीशी लग्न करणार होता, आणि तिथेच त्याला हंसिकेवर प्रेम जडलं! लग्नाच्या कार्यक्रमात त्यांची ओळख झाली अन् नवरा मुलगाच हंसिकाच्या प्रेमात पडलेला.