Hansika Motwani Officially Divorced From Husband Sohael Khaturiya: बॉलिवूडच्या (Bollywood News) ग्लॅमरस जगात अनेक नाती जुळतात आणि अनेक नाती तुटतात. असंच काहीसं घडलंय एका प्रसिद्ध अभिनेत्रीच्या आयुष्यात. बॉलिवूडच्या दिग्गज अभिनेत्रीच्या (Bollywood Actress) आयुष्यात वादळं आलं आहे. लग्नाच्या चारच वर्षांत बॉलिवूडच्या सुप्रसिद्ध अभिनेत्रीच्या संसाराचा दी एन्ड झालाय. बॉलिवूडमधील टॉप अभिनेत्रींच्या यादीत समाविष्ट होणारी सुप्रसिद्ध अभिनेत्री हंसिका मोटवानी (Hansika Motwani) हिनं चार वर्षांपूर्वी बिझनेसमन सोहेल खतुरिया (Sohael Khaturiya) याच्याशी विवाह केला होता. त्यावेळी हंसिका आणि सोहेल यांच्या रॉयल विवाहसोहळ्याची (Royal Wedding) जोरदार चर्चा रंगली होती. मात्र, लग्नाच्या चारच वर्षांत दोघांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे. या जोडप्यानं परस्पर संमतीनं वेगळं होण्याचा निर्णय घेतला असून कोर्टाकडूनही दोघांच्या घटस्फोटावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे.
सुप्रसिद्ध अभिनेत्री हंसिका मोटवानी हिच्या घटस्फोटाच्या बातमीनं सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. हंसिका आणि सोहेल खतुरिया हे आता अधिकृतपणे वेगळे झाले असल्याचं सांगितलं जात आहे. मीडिया रिपोर्टनुसार, मुंबईतील वांद्रे इथे असलेल्या कौटुंबिक न्यायालयानं (Family Court) हंसिका आणि सोहेल यांच्या घटस्फोटाला मंजुरी दिली आहे. लग्नाला अवघा तीन वर्षांहून काहीसा अधिक काळ लोटला असतानाच, दोघांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतल्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे.
हंसिका आणि सोहेल लग्नाच्या तीन वर्षांतच झालेले वेगळे
हंसिका आणि सोहेल यांनी डिसेंबर 2022 मध्ये जयपूर येथील 'मुंडोटा फोर्ट अँड पॅलेस'मध्ये एका भव्य समारंभात आपली लग्नगाठ बांधलेली. दोघांच्या विभक्त होण्याबाबतच्या चर्चा गेल्या वर्षांपासून समोर आल्या होत्या. हंसिकानं आपल्या इन्स्टाग्राम हँडलवरून सोहेलसोबतचे सर्व फोटो आणि व्हिडीओ डिलिट केले होते. तेव्हाच चाहत्यांना शंका आली होती. अशातच आता या जोडप्यानं आपले मार्ग वेगळे केले आहेत. गेल्या कित्येक दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे.
दोघांच्या घटस्फोटाला कोर्टाची मंजुरी
हंसिका आणि सोहेल आता अधिकृतपणे वेगळे झाले आहेत. मुंबईतील वांद्रे येथील कौटुंबिक न्यायालयानं (Family Court) आता त्यांच्या घटस्फोटाला मंजुरी दिली आहे. या जोडप्याच्या लग्नानंही प्रसारमाध्यमांचं लक्ष मोठ्या प्रमाणात वेधून घेतलं होतं. लग्नानंतर काही कालावधीतच, या दोघांमध्ये मतभेद निर्माण झाल्याच्या बातम्या समोर येऊ लागल्या. असं म्हटलं जातंय की, हे जोडपं क्षुल्लक गोष्टींवरून वारंवार वाद घालत असे. शिवाय, या दोघांची लाईफस्टाईल एकमेकांपेक्षा पूर्णपणे वेगळी होती. अखेरीस, एकत्र राहणं या दोघांसाठीही अशक्य झालं, ज्यामुळे दोघांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला.
मीडिया रिपोर्टनुसार, घटस्फोटानंतर हंसिका मोटवानीनं कोणत्याही प्रकारच्या पोटगीची (Alimony) मागणी केलेली नाही. न्यायालयातील सुनावणीदरम्यान तिचे वकील, अद्वान शेख, उपस्थित होते. हे सोहेलचं दुसरं लग्न होतं. हंसिकापूर्वी त्याचे लग्न रिंकी बजाज हिच्याशी झालं होतं.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
