Halad Rusali Kunku Hasal Marathi Serial : स्टार प्रवाहवर प्रेक्षकांना आजवर अनेक मनोरंजन करणाऱ्या आणि विनोदी मालिका पाहायला मिळाल्या आहेत. आता स्टार प्रवाहवर आणखी एक नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'हळद रुसली कुंकू हसलं', असं या मालिकेचं नाव आहे. स्टार प्रवाहने या मालिकेची थीम सांगणारे अनेक व्हिडीओ आणि प्रोमो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. प्रेक्षक देखील या मालिकेची आतुरतेने वाट पाहात असल्याचं चित्र आहे. 

Continues below advertisement


ग्रामीण भागातील आणि शहरी भागातील लोकांचा संघर्ष या मालिकेत दाखवला जाणार असल्याचं स्टार प्रवाहवरील प्रोमोवरुन दिसत आहे. सध्या स्टार प्रवाहने शेअर केलेल्या प्रोमोमध्ये हिरोची गाडी चिखलात स्लीप होते, असं दाखवण्यात आलंय. कृष्णा असं या मालिकेतील हिरोचं नाव असणार आहे. दरम्यान, गाडी स्लीप झाल्यानंतर हिरोईनच्या अंगावर पडतो आणि दोघांमध्ये वाद सुरु होतो. 




दरम्यान, हिरो खाली पडल्यानंतर हिरोईल त्याला उठवण्यासाठी हात देते. गावचा रस्ता आणि गाडी व्यवस्थित चालवायची, असं हिरोईन सांगते. बुंगाट चालवायची नाही, असं हिरोईन सांगते. तेव्हा हिरो चिडलेला पाहायला मिळतो. त्यावर हिरो म्हणतो की, तुझ्यामुळे चिखलात पडलो. त्यावर हिरोईन म्हणते, ज्यांची नाळ मातीशी जुडलेली असते, त्यांना चिखलाचं वावगं नसतंय. तुमच्या शहरी लोकांना काय कळणार म्हणा? 


दरम्यान, स्टार प्रवाहने शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये हिरो-हिरोईनचा वाद झालेला पाहायला मिळतोय. शेवटी हिरो तिला ईडिएट म्हणतोय. तर हिरोईल त्याला बुंगाट असं म्हणते. दोघं एकमेकांकडे बोट दाखवून खुन्नस देताना देखील पाहायला मिळतात. 


यापूर्वी देखील स्टार प्रवाहने अशाच पद्धतीचा एक व्हिडीओ शेअर केला होता. यामध्ये ग्रामीण आणि शहरी संस्कृतीतील अभिनेता आणि अभिनेत्री समोरा समोर आलेला पाहायला मिळाले होते. अभिनेत्री समृद्धी केळकर हिने ग्रामीण भागातील एका स्वाभिमानी मुलीची भूमिका साकारलेली पाहायला मिळते. यावेळी तिची गाय जखमी झालेली पाहायला मिळते.  बुलेटला जोडलेली बैलगाडी घेऊन डॉक्टरकडे निघालेली असते. अभिनेता कार घेऊन गावात आलेला असतो. दोघांमध्ये गाडी मागे घेण्यावरुन वाद झालेला पाहायला मिळतो. 


इतर महत्त्वाच्या बातम्या 


कपिल शर्माच्या शो मधील रिंकी आणि चिंकी या जुळ्या बहिणी वेगळ्या होणार, दोघींच्या संपत्तीचा आकडा ऐकून थक्क व्हाल


Harshaali Malhotra Will Debut in South Movie: 'बजरंगी भाईजान'ची मुन्नी दिसते भलतीच ग्लॅमरस, 65 वर्षांच्या हिरोसोबत स्क्रिन करणार शेअर