Dashavatar Upcoming Marathi Movie: मराठी चित्रपटसृष्टीतला (Marathi Film Industry) सर्वांत भव्य चित्रपट म्हणून गाजत असलेला 'दशावतार' चित्रपट (Dashavatar Movie) महाराष्ट्रापुरता (Maharashtra News) न राहता आता जागतिक स्तरावरही गाजू लागला आहे. आतापर्यंत महाराष्ट्रात आणि मराठी प्रेक्षकांमध्येच या चित्रपटाची चर्चा रंगली होती, मात्र आता सातासमुद्रापार न्यूयॉर्कच्या टाईम्स स्क्वेअरवर झळकलेल्या दिमाखदार टीझरमुळे या चित्रपटानं आंतरराष्ट्रीय स्तरावरही लक्ष वेधून घेतलं आहे. मराठी सिनेसृष्टीसाठी हा ऐतिहासिक क्षण ठरला असून, मराठी चित्रपटाचा डंका 'टाईम्स स्क्वेअर'वर वाजण्याची कदाचित ही पहिलीच वेळ आहे. महाराष्ट्रासह देशातल्या प्रमुख शहरांत आणि परदेशातही आता हा चित्रपट 12 सप्टेंबरलाच प्रदर्शित होणार आहे. 

Continues below advertisement

'दशावतार' या चित्रपटानं केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे तर जगभरातील रसिकांचे लक्ष वेधून घेतले आहे. महाराष्ट्रातील ऋढी परंपरा, संस्कृती, दमदार कथा आणि आधुनिक सिनेतंत्रातून निर्माण झालेली भव्यता यांचा संगम असलेल्या या चित्रपटामुळे मराठी चित्रपट जागतिक स्तरापर्यंतही झेप घेऊ शकतो याची जाणीव या निमित्ताने झाली आहे. ‘दशावतार’ मराठी अस्मिता आणि परंपरेचा जागतिक सोहळा ठरतोय.

दिग्दर्शक सुबोध खानोलकर म्हणतात, "दशावतार ही महाराष्ट्राच्या मातीतली गोष्ट असली तरी त्याचा विषय, त्यातली पात्रं आणि दिसणारा निसर्ग हा वैश्विक स्तरावर सहज आपलासा वाटणारा आहे. आणि त्यातच टाईम्स स्क्वेअरवर टीझर प्रदर्शित होणं ही आमच्या मेहनतीला मिळालेली आंतरराष्ट्रीय दाद आहे असं मला वाटतं. आपल्या मराठीचा डंका सातासमुद्रापार वाजतोय याचा मराठी माणूस म्हणून मला अभिमान आहे."

Continues below advertisement

झी स्टुडिओ मराठीचे व्यवसाय प्रमुख बवेश जानवलेकर म्हणतात, "दशावतार' महाराष्ट्रापुरता मर्यादित न राहता ग्लोबली प्रदर्शित व्हावा, हा आमचा ध्यास होता. टाईम्स स्क्वेअरवरील झळकलेला टीझर हे त्या जागतिक प्रवासाचं पहिलं पाऊल आहे. आता जगभरातील प्रेक्षक ‘दशावतार’ला कसा प्रतिसाद देतात, हे पाहण्यासाठी आम्ही आतुर आहोत."

झी स्टुडिओज प्रस्तुत, ओशन फिल्म कंपनी आणि ओशन आर्ट हाऊस निर्मित या चित्रपटात मराठीतील दिग्गज कलाकारांचा सहभाग आहे. दिलीप प्रभावळकर, महेश मांजरेकर, भरत जाधव, सिद्धार्थ मेनन, अभिनय बेर्डे, प्रियदर्शिनी इंदलकर, विजय केंकरे, सुनील तावडे, रवी काळे, लोकेश मित्तल, आरती वडगबाळकर यांच्या या चित्रपटात मुख्य भूमिका आहेत. 

गुरु ठाकूर यांचे संवाद आणि गीते, ए. व्ही. प्रफुल्लचंद्र यांचं संगीत आणि दमदार निर्मितीमुळे हा चित्रपट एक मोठा सिनेमॅटिक अनुभव ठरणार आहे. येणाऱ्या 12 सप्टेंबरला प्रदर्शित होणारा हा भव्य चित्रपट जगभरातल्या प्रेक्षकांना महाराष्ट्राची, इथल्या भव्य निसर्गाची, ऋढी परंपरांची आणि लोककलांची नव्याने ओळख करुन देणार आहे.

पाहा ट्रेलर :