Grammy Awards 2023 Winners : 'ग्रॅमी पुरस्कार' (Grammy Awards 2023) हा संगीतक्षेत्रातील मानाचा पुरस्कार मानला जातो. 65 वा ग्रॅमी पुरस्कार सोहळा नुकताच पार पडला आहे. यंदाच्या पुरस्कार सोहळ्यात लोकप्रिय पॉप गायिका बियॉन्से नॉलेस (Beyonce) आणि भारतीय संगीतकार रिकी केजने (Ricky kej) सर्वांचं लक्ष वेधलं आहे. 'ग्रॅमी पुरस्कार 2023'च्या विजेत्यांची संपूर्ण यादी जाणून घ्या...



  • सॉंग ऑफ द इयर - बियॉन्से नॉलेस (ब्रेक माय सोल)

  • सर्वोत्कृष्ट पॉप सोलो - अॅडले (इजी ऑन मी)

  • सर्वोत्कृष्ट इलेक्ट्रॉनिक अल्बम - बियॉन्से नॉलेस (रेनायसान्स)

  • सर्वोत्कृष्ट रॅप अल्बम - केन्ड्रिक लॅमर (मिस्टर मोर्ले अॅन्ड द बिग स्टेपर्स)

  • सर्वोत्कृष्ट संगीत अर्बना अल्बम (बॅड बनी - अन वेरानो सिन टी)

  • सर्वोत्कृष्ट समुह सादरीकरण - सॅम स्मिथ आणि किम पेटर्स (अनहोली)

  • सर्वोत्कृष्ट कंट्री अल्बम - वीले नेलसॉन - अ ब्यूटीफुल टाईम 

  • सर्वोत्कृष्ट पॉप वोकल अल्बम - हॅरी स्टाईल (हॅरी हाऊस)

  • सर्वोत्कृष्ट इनसर्विव्ह अल्बम - रिकी केज (डिव्हाईन टाइड्स)

  • सर्वोत्कृष्ट रॅगी अल्बम - द कॉलिंग-कबाका पैयरामिड


'ग्रॅमी पुरस्कार 2023'मध्ये बियॉन्सेने रचला इतिहास


'ग्रॅमी पुरस्कार 2023'मध्ये बियॉन्सेचा बोलबाला होता. गेल्या 65 वर्षांत बियॉन्सेने 32 वेळा गॅमी पुरस्कारावर आपलं नाव कोरलं आहे. या पुरस्कार सोहळ्यात बियॉन्सेला इलेक्टॉनिक म्युझिक अल्बम या कॅटेगरीमध्ये पुरस्कार मिळाला आहे. बियॉन्सेचा मोठा चाहतावर्ग असून तिची गाणी चाहत्यांच्या पसंतीस उतरतात. 






रिकी केजचीसाठी 'ग्रॅमी पुरस्कार 2023' खास


भारतीय संगीतकार रिकी केजसाठी यंदाचा 'ग्रॅमी पुरस्कार 2023' खास ठरला आहे. रिकीला सर्वोत्कृष्ट इमर्सिव्ह ऑडिओ अल्बम या कॅटेगरीमध्ये यंदाचा ग्रॅमी पुरस्कार मिळाला आहे. रिकीने तिसऱ्यांदा ग्रॅमी पुरस्कारावर मोहर उमटवली आहे. त्यामुळे चाहते आनंदी झाले आहेत. 






संगीत क्षेत्रातील मानाचा पुरस्कार म्हणून ‘ग्रॅमी’चं नाव घेतलं जातं. हा पुरस्कार नॅशनल ॲकॅडमी ऑफ रेकॉर्डिंग आर्ट्‌स ॲन्ड सायन्स या संस्थेतर्फे दिला जाणारा एक पुरस्कार आहे. ग्रॅमी पुरस्कार हा संगीतक्षेत्रातील सर्वोत्तम योगदानासाठी दिला जातो. जगभरातील संगीतप्रेमींसाठी अत्यंत मानाचा असा हा पुरस्कार आहे. 


संबंधित बातम्या


Grammy Awards 2023 : अभिमानास्पद! भारताच्या रिकी केज यांनी तिसऱ्यांदा कोरलं ग्रॅमी पुरस्कारावर नाव; पोस्ट शेअर करत म्हणाले...