Govinda Sunita Ahuja Divorce Manager Reacts: गोविंदा (Govinda) आणि सुनीता आहुजा (Sunita Ahuja) सध्या दोघेही आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहेत. गोविंदाचा कोमल रानीसोबतचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सुनीता आहुजाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. यात तिने गोविंदाला, 'आपल्या लेकीच्या वयाच्या मुलीसोबत फिरतोय, लाज वाटली पाहिजे', असं सुनीताने म्हटलं होतं. यानंतर गोविंदाने देखील व्हिडीओ शेअर (Entertainment) केला होता. यानंतर संतापलेल्या गोविंदाने सुनीताला 'आपल्या मर्यादेत राहण्याचा' कडक इशारा दिला. अलिकडेच सुनीताने मुंबईतील वांद्रे येथील फॅमिली कोर्टात जाऊन गोविंदाविरोधात दाखल केलेली घटस्फोटाची याचिका अधिकृत मागे घेतली आहे. पण तिने यावेळी असाही दावा केला की, गोविंदा आणि कोमल रानी स्वर्णकार हे दोघेही लग्न करणार होते.
गोविंदा खरंच दुसरं लग्न करण्याच्या तयारी होता का? (Did Govinda plan a second marriage with Komal Rani)
सुनीताने केलेल्या दाव्यामुळे अक्षरश: खळबळ उडाली. गोविंदाच्या मॅनेजरने हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. 'सुनीताच्या डोक्यात नक्कीच काही तरी सुरू आहे', असं त्याने म्हटलं आहे. सुनीताने गोविंदाच्या दुसऱ्या लग्नाबाबत तेव्हा दावा केला होता, जेव्हा ती राखी सावंतसोबत फोनवर बोलत होती. राखीचा सुनीतासोबत फोनवर बोलतानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे. नुकतेच, राखी सावंतने पापाराझींसमोर सुनीता अहुजा फोन लावला होता. तिने फोन स्पीकरवर ठेवला होता. तेव्हा सुनीताने खुलासा केला की, गोविंदा आणि कोमल एकत्र लग्न करण्याचे प्लानिंग करत होते.
राखीने सुनीताला धैर्याने या गोष्टी हाताळण्यास सांगितले. तसेच गोविंदाच्या 200 कोटी रुपयांच्या मालमत्तेवर लक्ष केंद्रीत करण्याचा सल्ला दिला. आता गोविंदाच्या मॅनेजरने सुनीताद्वारे गोविंदावर लावण्यात आलेल्या दुसऱ्या लग्नाच्या आरोपांवर भाष्य केलं आहे. गोविंदाच्या मॅनेजरने हे आरोप पूर्णपणे फेटाळून लावले आहेत. तसेच सुनीताने केलेल्या दाव्यावर आश्चर्यही व्यक्त केलं आहे.
'इंडिया टुडेशी' बोलताना गोविंदाचा मॅनेजर शशि सिन्हा म्हणाला की, 'मी हे तुमच्याकडून ऐकत आहे. असे काहीही नाही. असणारही नाही. दुसरे लग्न झालेले नाही. सुनीता त्याची पत्नी आहे. असे दावे सुनीता करत आहे, म्हणजेच, तिच्या डोक्यात काहीतरी सुरू आहे', असं तिने म्हटलं. शशि सिन्हा म्हणाला की, 'गोविंदाला जर खरंच दुसरं लग्न करायचं असतं तर, त्याने स्वत:हून घटस्फोटासाठी अर्ज केला असता. त्याऐवजी सुनीताने घटस्फोटासाठी अर्ज केला. नंतर तो अर्ज मागे घेण्याचा निर्णय घेतला'. यानंतर शशि सिन्हाने मुलांच्या भविष्याचा विचार करण्याचा सल्ला दिला. 'दोघेही समजूतदार लोक आहेत. गोविंदाने सार्वजनिकरित्या सुनीताबद्दल कधीही वाईट काही म्हटलेलं नाही. सुनीतानेच कौटुंबिक बाबी उघडकीस आणल्या आहेत. मला खात्री आहे की, दोघांच्याही मनात स्वत:चे आणि त्यांच्या मुलांचे हित आहे', असं शशि सिन्हा म्हणाला.
म्हत्त्वाच्या इतर बातम्या:
IAS तुकाराम मुंढेंच्या आयुष्यावर बायोपिक येणार? भूमिकेसाठी अक्षय कुमार की के.के. मेनन?
