Govinda on Ending his life: बॉलिवूड (Bollywood) अभिनेता गोविंदा (Govinda) बऱ्याचदा आपल्या पर्सनल लाईफमुळे चर्चेत असतो. त्याने आपल्या कारकिर्दीत अभिनय तसेच डान्समधून प्रेक्षकांचं मनोरंजन (Entertainment) केलं. चित्रपटांपेक्षा गोविंदाचे गाणे आजही हिट आहेत. गोविंदाने आपल्या चित्रपटातून प्रेक्षकांना खळखळून हसवलं. पण एक काळ असा होता, जेव्हा अभिनेत्याच्या मनात आत्महत्या करण्याचा विचार आला होता. अभिनेत्याच्या 30 वर्षांपूर्वी मनात आलेली भावना आज त्याने व्यक्त करून दाखवली. आत्महत्या करण्याचा विचार मनात येण्यामागचं कारण काय?

Continues below advertisement

गोविंदाच्या मनात का आत्महत्या करण्याचा विचार आला होता? (Govinda Reveals He Once Thought of Ending His Life)

अलीकडेच गोविंदाने ANI ला मुलाखत दिली होती. या मुलाखतीचा प्रोमो आता समोर आला आहे. या मुलाखतीत अभिनेत्याला त्याच्या पर्सनल आयुष्याबाबत काही प्रश्न विचारण्यात आले. ज्याचे अभिनेत्याने सडेतोड उत्तर दिले. यावेळी अभिनेत्याने एक धक्कादायक खुलासा केला. अभिनेत्यावर एक काळ असा ओढवला गेला होता, ज्यामध्ये तो पूर्णपणे खच्चून गेला होता. त्याने सांगितलं की, तो जवळजवळ स्वतःच्या मरणाला कवटाळणार होता.

'जीवन जगण्याची आशा सोडून दिली होती', 30 वर्षांपूर्वी गोविंदासोबत असं नेमकं काय घडलं होतं? (Govinda Opens Up About His Darkest Phase before 30 years)

गोविंदाने सांगितलं की त्यावेळी त्याने आपल्या आईला गमावले होते. त्यावेळी जीवन जगण्याची आशा त्याने सोडून दिली होती. अभिनेता नर्मदा नदीमध्ये उतरला होता, असं त्याने सांगितलं. 'आतापर्यंत कुणी तुमचं हृदय तोडलं'? असा प्रश्न गोविंदाला विचारण्यात आला. तेव्हा गोविंदाने, 'असं काही घडलं नाही ' असं त्याने उत्तर दिलं. आपल्या आईला गमावल्यानंतर गोविंदा म्हणाला, 'जेव्हा आई मला सोडून गेली, तेव्हा असं वाटलं सगळं काही संपलं. मी नर्मदा नदीमध्ये गेलो'.

Continues below advertisement

'मी पाण्यात जात राहिलो. मला वाटलं माझी आई मला आई भेटेल. मग माझ्या मनात विचार आला की, माझी लहान लेकरू आहेत', असं गोविंदा म्हणाला. गेल्या काही महिन्यांपासून गोविंदा आणि त्याची पत्नीमध्ये वाद विवाद सुरू आहेत. गोविंदाच्या अफेअरबाबत ती काही ना काही बोलत असते. दोघांच्या घटस्फोटाचीही चर्चा रंगली होती.  दरम्यान, अद्याप दोघांनीही घटस्फोट घेतलेला नाही.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

Detective on Actress: 'पैशांसाठी ठेवते शरीरसंबंध, पब्लिकमध्ये तिची क्युट इमेज', डिटेक्टिव्हचा प्रसिद्ध अभिनेत्रीबाबत धक्कादायक दावा