Govinda Manager Reacts On Actor Being Bankrupt: सुपरस्टार गोविंदाचं निघालं दिवाळं, घरसुद्धा गहाण ठेवलं? पैशांसाठी करतोय शाळांमध्ये परफॉर्म? मॅनेजर म्हणाला...
Govinda Manager Reacts On Actor Being Bankrupt: अलिकडेच, जेव्हा गोविंदा खाजगी कार्यक्रमांमध्ये आणि एका कॉलेजच्या कार्यक्रमात नाचताना दिसला तेव्हा तो दिवाळखोर झाला आहे आणि त्याला पैशांची गरज असल्यानं तो अशा कार्यक्रमांमध्ये परफॉर्म करत आहे, अशा अफवा पसरल्या.

Govinda Manager Reacts On Actor Being Bankrupt: गेल्या काही काळापासून सोशल मीडियावर अभिनेता गोविंदाबद्दल (Actor Govinda) अनेक चर्चांना उधाण आलंय. तब्बल वर्षभरापासून त्याच्या वैवाहिक जीवनात अडचणी आल्याचं बोललं जात आहे. तर कुणी म्हणतंय की, त्यांच एका मराठी अभिनेत्रीसोबत अफेअर सुरू आहे, त्यामुळेच त्याच्या पत्नीनं त्याच्याकडे घटस्फोटाची मागणी केली आहे. पण, कॅमेऱ्यासमोर पत्नी आणि गोविंदा मात्र एकत्रच दिसत आहेत. तर, आता गोविंदा दिवाळखोरीत निघाल्याचंही बोललं जात आहे. आता यावर गोविंदाचे मॅनेजर शशी सिन्हा यांनी स्पष्टीकरण दिलंय. गोविंदावर शाळा, कॉलेजमध्ये जाऊन परफॉर्म करण्याची वेळ का आली? याबाबत त्यांनी सांगितलं आहे.
अलिकडेच, जेव्हा गोविंदा खाजगी कार्यक्रमांमध्ये आणि एका कॉलेजच्या कार्यक्रमात नाचताना दिसला तेव्हा तो दिवाळखोर झाला आहे आणि त्याला पैशांची गरज असल्यानं तो अशा कार्यक्रमांमध्ये परफॉर्म करत आहे, अशा अफवा पसरल्या. गोविंदाचे मॅनेजर शशी सिन्हा यांनी आता यावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी गोविंदाच्या दिवाळखोरीच्या चर्चा या निव्वळ अफवाच असल्याचं सांगितलं आहे. तसेच, कधीकाळी अभिनेता आर्थिक अडचणींमध्ये सापडला होता, त्यामुळे त्यातून बाहेर पडण्यासाठी त्यानं स्वतःचं राहतं घर गहाण ठेवून कर्ज फेडलेलं. पण, आता अभिनेत्यानं ते कर्ज पूर्णपणे फेडल्याचंही मॅनेजरनं सांगितलं.
अलिकडेच, गोविंदाचा एक व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामध्ये तो उत्तर प्रदेशामध्ये एका साध्या टॅक्सीमधून प्रवास करताना दिसतोय. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, ज्यामुळे युजर्सनी गोविंदाचीआर्थिक परिस्थिती खालावल्याचे अंदाज बांधायला सुरुवात केली आहे. कधीकाळी बीएमडब्ल्यू आणि मर्सिडीज-बेंझ चालवणारा स्टार आता साध्या टॅक्सीनं प्रवास करतोय, अशी चर्चा सोशल मीडियावर सुरू झाली. गोविंदाचे मॅनेजर शशी सिन्हा यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे.
त्यांच्याकडे खूप लग्झरी कार्स आहेत, दे दिवाळखोर झालेले नाहीत : शशी सिन्हा
गोविंदाचे मॅनेजर म्हणाले की, "गोविंदाचे खाजगी कार्यक्रम आणि शाळांमध्ये परफॉर्म करणं आणि त्याचं सध्याचं साधं राहनीमान याचा आर्थिक अडचणींशी काहीही संबंध नाही. त्यांनी एएनआयला सांगितलं की, "गोविंदाकडे फक्त एकच नाही तर अनेक गाड्या आहेत. तो दिवाळखोर आहे आणि भीक मागतोय, असं म्हणणं पूर्णपणे मूर्खपणाचं आहे. परफॉर्म करणं हा त्याचा व्यवसाय आहे. याचा अर्थ असा नाही की, तो दिवाळखोर आहे. त्या वेळी विमानतळाच्या आत खाजगी वाहनांना परवानगी नव्हती. जर तो त्याच्या कुटुंबाची काळजी घेत नसता तर कोण घेतली असती? तो अजूनही त्याच्या पत्नी आणि मुलांची काळजी घेतोय..."
"गोविंदाच्या मागे कित्येक अभिनेते, निर्माते लागलेयत, अभिनेत्यानं कोट्यवधींच्या ऑफर्स नाकारल्यात..."
शशी सिन्हा म्हणाले की, गोविंदानं कित्येक वर्ष कोणत्याही फिल्ममध्ये काम केलेलं नाही, तरीसुद्धा तो केवळ इव्हेंट्स आणि डान्स परफॉर्मन्स नाही, तर फिल्म्ससाठीही खूप डिमांडमध्ये असतो.
मॅनेजर म्हणाले की, "मी याचा साक्षीदार आहे की, त्यानं कोट्यवधी रुपयांच्या ऑफर्स नाकारल्या आहेत. पटकथा किंवा असं काहीतरी आवडलं नाही हे ठीक आहे, पण तो पहिला अभिनेता आहे, ज्याचा चित्रपट हिट नाही, तरीही मोठे निर्माते आणि अभिनेते अजूनही त्याचा पाठलाग करत आहेत. याचा अर्थ असा नाही की, त्यानं काम करणं थांबवलंय. तुम्हाला लवकरच एक मोठी घोषणा ऐकायला मिळेल..."
























