Will Govinda Have Cameo In Avatar 3? जेम्स कॅमरुनच्या (James Cameron) सिनेमाची जादू संपूर्ण देशभरात पाहायला मिळत आहे. अलिकडेच, जेम्स कॅमेरुनच्या बहुप्रतिक्षित सिनेमाचा तिसरा पार्ट रिलीज करण्यात आला. 'अवतार: फायर अँड अॅशेस' (Avatar: Fire and Ash) थिएटर्समध्ये झळकला आणि बॉक्स ऑफिसवर (Box Office) खळबळ उडाली. सिनेमानं पहिल्या सोमवारी 8.5 कोटी कमावले होते. जेम्स कॅमरुनच्या सिनेमानं आतापर्यंत भारतात 67 कोटी कमावलेत. दरम्यान, सोशल मीडियावर (Social Media) एक व्हिडीओ वेगानं व्हायरल होत आहे. ज्यामुळे गोविंदाचे चाहतेही आनंदी आहेत.
व्हायरल व्हिडीओमध्ये, गोविंदा 'नेव्ही' म्हणून दिसतोय, ज्यामुळे चाहत्यांनी असा अंदाज बांधला आहे की, तो 'अवतार: फायर अँड अॅशेस'मध्ये एक छोटासा कॅमिओ करणार आहे. दरम्यान, या व्हायरल व्हिडीओचं सत्य काही वेगळंच आहे.
जेम्स कॅमेरॉनच्या 'अवतार: फायर अँड अॅश'मध्ये गोविंदाचा कॅमिओ
सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या एका व्हिडीओमध्ये, गोविंदा जेम्स कॅमरुनच्या 'अवतार: फायर अँड अॅश'मध्ये दिसतोय. गोविंदा डेव्हिड धवनच्या 1997 च्या रोमँटिक कॉमेडी चित्रपट 'दीवाना मस्ताना'मधला त्याचा गाजलेला डायलॉग 'हटा सावन की घटा' म्हणतोय. व्हिडीओ शेअर करत असलेल्या कॅप्शनमध्ये असं म्हटलंय की, जेम्स कॅमरुनच्या 'अवतार: फायर अँड अॅश'च्या तिसऱ्या भागात हा त्याचा कॅमिओ आहे. यामुळे चाहत्यांना आश्चर्य वाटलं, पण सत्य काही वेगळंच आहे.
गोविंदाचा व्हिडीओ AI जनरेटेड (Govinda's Video Is AI Generated)
जर गोविंदाचा हा व्हायरल व्हिडीओ तुम्हाला असं वाटत असेल की, 'अवतार: फायर अँड अॅश' मध्ये त्याचा कॅमिओ आहे, तर आम्ही तुम्हाला सांगतो की, हे खोटं आहे. खरं तर, गोविंदाचा हा व्हिडीओ AI जनरेटेड आहे. खरंतर, हा एआय जनरेटेड व्हिडीओ गोविंदाच्या जुन्या दाव्यांचे परिणाम आहे, ज्यात त्यानं म्हटलं होतं की, जेम्स कॅमरुनने त्याला त्याच्या 'अवतार' चित्रपटात भूमिका करण्याची ऑफर दिली होती, पण त्यानं हा चित्रपट करण्यास नकार दिलेला.
'अवतार'बाबत गोविंदा नेमकं काय म्हणालेला?
मुकेश खन्ना यांच्या मुलाखतीत गोविंदानं दावा केलेला की, 2009 मध्ये प्रदर्शित झालेल्या पहिल्या चित्रपट 'अवतार'मध्ये जेम्स कॅमरुनने त्याला मुख्य भूमिका देऊ केली होती. त्यानं असाही दावा केला की, तो कॅमरुनला दोनदा भेटला होता आणि त्याला 'अवतार' हे शीर्षकही त्यानंच सुचवलं होतं. दरम्यान, जेव्हा कॅमरुनने त्याला ही भूमिका देऊ केली, तेव्हा त्यानं नकार दिला कारण तो त्याचं शरीर निळ्या रंगानं रंगवण्यास तयार नव्हता. त्यानं पात्राच्या अपंगत्वावरही आक्षेप घेतला होता.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
