Telegram: भारतात डिजिटल मीडिया आणि ओटीटी प्लॅटफॉर्मची क्रेझ सतत वाढत आहे. बरेच लोक त्यांच्या मोबाईल फोन किंवा स्मार्ट टीव्हीवर थेट चित्रपट, वेब सिरीज, व्हिडिओ आणि शो पाहतात.अलिकडच्या काळात ओटीटी जगात अश्लील आणि आक्षेपार्ह कंटेंट देखील वेगाने पसरत आहे. म्हणूनच केंद्र सरकारने एक कठीण आणि मोठा निर्णय घेतला होता. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने अश्लील कंटेंटमुळे भारतातील पाच ओटीटी प्लॅटफॉर्म ब्लॉक केले होते. आता ऑनलाइन पायरसीवर आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने मोठे पाऊल उचलले आहे. अनेक OTT प्लॅटफॉर्म्सच्या तक्रारीनंतर मेसेजिंग अॅप टेलीग्रामला नोटीस बजावण्यात आली आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने Information Technology Act, 2000 अंतर्गत ही कारवाई केली असून टेलिग्रामवरील पायरेटेड कंटेंट तात्काळ हटवण्याचे निर्देश दिले आहेत.

Continues below advertisement

OTT कंपन्यांची मोठी तक्रार

OTT कंपन्यांनी आरोप केला आहे की टेलिग्रामवर मोठ्या प्रमाणात असे चॅनेल चालवले जात आहेत, जिथे चित्रपट आणि वेब सिरीज बेकायदेशीररित्या शेअर केल्या जातात. तक्रार करणाऱ्या प्लॅटफॉर्म्समध्ये JioCinema आणि Amazon Prime Video यांसारख्या प्रमुख OTT सेवांचा समावेश आहे.

टेलिग्रामच्या 3142  चॅनेल्सची ओळख

मंत्रालयाने या प्रकरणाची चौकशी केल्यानंतर एकूण 3142 टेलिग्राम चॅनेल्स ओळखण्यात आली आहेत. या चॅनेल्सवर नवीन चित्रपट, वेब सिरीज आणि इतर OTT कंटेंट परवानगीशिवाय शेअर केला जात असल्याचे आढळून आले आहे. सरकारच्या मते, अशा प्रकारच्या कृतीमुळे कॉपीराइट कायद्यांचे गंभीर उल्लंघन होत असून चित्रपट आणि डिजिटल मनोरंजन उद्योगाला मोठा आर्थिक फटका बसतो.

Continues below advertisement

टेलिग्रामला तातडीची कारवाई करण्याचे आदेश

माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने टेलिग्रामला या चॅनेल्सविरोधात तातडीने कारवाई करून पायरेटेड कंटेंट हटवण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच भविष्यात अशा प्रकारच्या बेकायदेशीर कृतींना आळा घालण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्यासही सांगितले आहे. डिजिटल प्लॅटफॉर्म्सवर वाढणाऱ्या पायरेसीबाबत सरकारने कठोर भूमिका घेतली असून कॉपीराइटचे उल्लंघन करणाऱ्या चॅनेल्स आणि प्लॅटफॉर्म्सविरोधात पुढेही कडक कारवाई केली जाईल, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.