Marathi Director Santosh Davakhar Buys Four Luxury Cars: थिएटर गाजवल्यानंतर आता मराठी 'गोंधळ' (Gondhal Marathi Movie) लवकरच ओटीटीवर रिलीज होणार आहे. मराठी संस्कृतीचा अस्सल गंध, लोकपरंपरेची ताकद आणि आधुनिक विचारांची प्रभावी सांगड घालणाऱ्या 'गोंधळ' या मराठी सिनेमानं आंतरराष्ट्रीय पातळीवर नवा इतिहास घडवलाय. अशातच आता हा सिनेमा ओटीटीवर धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज आहे. एकीकडे 'गोंधळ' सिनेमाच्या ओटीटीवर (Gondhal OTT Released) रिलीज होण्याच्या आणि ओटीटी प्लॅटफॉर्मवर (OTT Platform) मोठी डील मिळवण्याच्या चर्चा सुरू असतानाच आता 'गोंधळ' सिनेमाचे दिग्दर्शक चर्चेत आले आहेत. सोशल मीडियावर त्यांनी केलेल्या एका पोस्टवरुन चर्चांना उधाण आलं आहे. 

Continues below advertisement

महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीतल्या अत्यंत पारंपरिक, धार्मिक आणि कलात्मक घटक असलेल्या 'गोंधळ' या परंपरेवर आधारित असलेल्या सिनेमानं आंतरराष्ट्रीय पातळीवर बोलबाला केलाय. अशातच आता या सिनेमाचे ओटीटी राइट्स मोठ्या किमतीला विकले गेल्याचं बोललं जात आहे. त्याला कारणंही तसंच आहे. 'गोंधळ' सिनेमाचे मराठमोळे दिग्दर्शक संतोष डावखर (Director Santosh Davkhar) यांनी एकाच दिवशी एक, दोन नाहीतर तब्बल चार लग्झरी गाड्यांची केलेली खरेदी चर्चेत आली आहे. ओटीटी राईट्सच्या पैशातून दिग्दर्शक चांगलेच मालामाल झाल्यामुळे त्यांनी एका फटक्यात चार लग्झरी कार खरेदी केल्याचं बोललं जात आहे. शिवजयंतीच्या दिवशी, 'गोंधळ' सिनेमाचे ओटीटी राइट्स विकले गेल्याची माहिती समोर आली आहे.

'गोंधळ' सिनेमाचे दिग्दर्शक संतोष डावखर यांनी नेटफ्लिक्स, ॲमेझॅान प्राईम व्हिडिओ आणि  झी फाईव्ह सारख्या मोठ्या ओटीटी प्लॅटफॉर्म्सना सिनेमाचे राइट्स विकल्याचं बोललं जात आहे. या ओटीटी डिलमधून दिग्दर्शकांनी बक्कळ पैसा कमावल्याची कुजबुजही सुरू आहे. 'गोंधळ' सिनेमाच्या ओटीटी डिलबाबत किंवा ओटीटी रिलीजबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नसली तरीसुद्धा चर्चांना मात्र उधाण आलं आहे. त्यात दिग्दर्शकांनी एकाच दिवशी घेतलेल्या चार आलिशान गाड्यांचा फोटोही सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. 

Continues below advertisement

दिग्दर्शक संतोष डावखर यांनी रेंज रोव्हर, डिफेंडर, बीएमडब्ल्यू, बीव्हायडी सीलायन या सहा कोटींच्या गाड्या विकत घेतल्या आहेत. तसेच, या गाड्यांसोबतचा संतोष डावखर यांचा फोटोही व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर दबक्या आवाजात सुरू असलेल्या चर्चांनुसार, दिग्दर्शक संतोष डावखर यांच्या ताफ्यात आधीपासूनच मेबाख ही आलिशान गाडी असून त्यांनी आता रेंज रोव्हर, डिफेंडर, बीएमडब्ल्यू, बीव्हायडी सीलायन या नव्या गाड्या खरेदी केल्याचं म्हटलं जातंय.

दरम्यान, संतोष डावखर दिग्दर्शित 'गोंधळ' सिनेमानं फक्त राष्ट्रीयच नाहीतर आंतरराष्ट्रीय स्तरावरही धुमाकूळ घातला. सर्वच स्तरांतून सिनेमावर कौतुकाचा वर्षाव करण्यात आला. इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडिया (इफ्फी) मधील इंडियन पॅनोरमा विभागात 56 वर्षांत पहिल्यांदाच मराठी सिनेमानं सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा 'सिल्व्हर पिकॉक' अवॉर्ड पटकावला.  'गोंधळ'नं राष्ट्रीय पातळीवर मोठी नाव मिळवलं. नुकत्याच पार पडलेल्या झी चित्र गौरव पुरस्कार 2026 मध्ये 'गोंधळ'ला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक (पदार्पण), सर्वोत्कृष्ट छायाचित्रण आणि सर्वोत्कृष्ट कला दिग्दर्शक असे पुरस्कारही मिळाले आहेत.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

एकट्यानं पाहण्याची हिंमत असेल, तरच पाहा 'या' 7 हॉरर फिल्म्स; पैज लावून सांगतो, अंगाचा थरकाप उडेल!