Girish Pardeshi on Foreignchi Patlin: आजही आवडीने पाहिला जाणारा सिनेमा म्हणजे 'फॉरेनच्या पाटलीण' (Foreignchi Patlin). हा सिनेमा एका परदेशी तरुणीवर (Entertainment) आधारीत आहे. ही तरुणी भारतीय तरुणाशी लग्न करते आणि महाराष्ट्रात येते. महाराष्ट्रात आल्यानंतर परदेशातील तरुणी संस्कृतीला आनंदाने फॉलो करते. या सिनेमातील तरुणी परदेशातील रहिवासी असून, तिनं या चित्रपटात उत्तम अभिनय सादर केला आहे. या सिनेमात फॉरेनची तरुणी गिरीश परदेशीसोबत संसार थाटते. नुकतंच गिरीश परदेशीनं 'महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनच्या सेलिब्रिटी कॉर्नरला' मुलाखत दिली होती. यावेळी त्यानं सिनेमातील अनेक किस्से शेअर केले.
'फॉरेनच्या पाटलीण' या सिनेमातील मजेदार किस्से (Foreign Actress Shocked Villagers During Foreignchi Patlin Shoot)
'फॉरेनच्या पाटलीण' हा एव्हरग्रीन सिनेमा आजही प्रेक्षकवर्ग आवडीने पाहतात.या सिनेमात बिलियाना रॅडोणीक या अभिनेत्रीनं जेनिफर हे पात्र साकारलं होत. दरम्यान, या चित्रपटासाठी अभिनेता गिरीश परदेशीची निवड कशी झाली? याची माहिती अभिनेत्यानं दिली. तसेच फॉरेनर अभिनेत्रीसोबत काम करतानाचा अनुभव कसा होता? या सिनेमातील अनेक किस्से यावेळी अभिनेत्यानं शेअर केले. सिनेमातील एक मजेदार किस्सा सांगताना अभिनेता म्हणाला, 'एक सीक्वेन्स आम्ही शूट करत होतो. ज्यात ती नऊवारी साडी नेसते. तेव्हा ऑक्टोबरची हिट होती'.
'आम्ही खेड्या पाड्यात शूट करत होतो. ब्रेक झाल्यानंतर तिने नऊवारी साडी सोडली. तिला गरम झालं होतं. म्हणून ती परकर आणि ब्लाऊजवर बसली होती. त्यांच्या मानसिकतेमध्ये असं ते बसू शकतात. कारण त्यांच्यासाठी हे ऑड वाटणारं नाही. परंतु, आपल्याला बघताना, ब्लाऊज, परकरवर बसलेली, डोक्यावर आंबाडा घातलेली बाई बघायला जरा ऑड वाटतं'.
'तेवढ्यात तिला फोन आला होता. मग ती गावात फिरत फोनवर बोलत गेली. त्यानंतर सुरेखा आणि आमची हेअर ड्रेसर तिच्या मागे मागे गेल्या. अगं बाई, अशी नको फिरुस आत चल...असं तिला म्हणाल्या. त्यानंतर तिला समजावून सांगितलं. त्यानंतर तिनं अंगाभोवती वस्त्र परिधान केलं. मग ती पुढे गेली', हा किस्सा गिरीश परदेशीनं शेअर केला.
महत्त्वाच्या इतर बातम्या:
रोहिणी पाराध्येपूर्वीही महाराष्ट्राने गमावले अनेक रिलस्टार्स; कुणाचा अपघात, तर कुणाचा...
