Bollywood: बॉलिवूडमध्ये अशा काळात पदार्पण करणारा एक अभिनेता, जेव्हा वरुण धवन, आलिया भट्ट, कृति सनोन आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांसारखे नवोदित कलाकार इंडस्ट्रीत पाऊल ठेवत होते… पण फिल्मी घराण्यातून असूनही गिरीश कुमार (Girish Kumar) मात्र अभिनयात फारशी कमाल दाखवू शकला नाही. 2013 मध्ये आलेल्या ‘रमैया वस्तावैया’ या चित्रपटातून गिरीशने करिअरची सुरुवात केली. त्यांच्या निरागस आणि क्यूट लूकमुळे प्रेक्षकांचं लक्ष जरूर वेधलं, पण दोनच चित्रपटांनंतर त्यांनी अभिनयाला रामराम ठोकला . पण हा कलाकार नेट वर्थच्या बाबतीत मोठमोठ्या कलाकारांना मागे टाकतोय. हा कलाकार  गेला कुठे? तो काय करतो?

Continues below advertisement

दोन चित्रपट, दोन्हीचा फिका प्रतिसाद

रमैया वस्तावैया बॉक्स ऑफिसवर फक्त सरासरी ठरला. या चित्रपटात त्यांच्यासोबत श्रुति हासन होती. चित्रपटाचं ‘जीने लगा हूं’ हे गाणं सुपरहिट झालं, पण गिरीशला मात्र हवा तसा स्टारडम मिळाला नाही. यानंतर 2016 मध्ये आलेला त्यांचा दुसरा चित्रपट ‘लवशुदा’ बॉक्स ऑफिसवर आपटला. आणि याच अपयशानंतर गिरीशने अभिनय सोडण्याचा निर्णय घेतला.

अभिनय सोडला, पण इंडस्ट्री नाही

गिरीश कुमार प्रसिद्ध फिल्ममेकर कुमार एस. तौरानी यांचे पुत्र आणि रमेश तौरानी यांचे पुतण्या आहे. म्हणजेच टिप्स इंडस्ट्रीज या मोठ्या संगीत-चित्रपट बॅनरमागील हेच कुटुंब! अभिनय सोडल्यानंतर गिरीश थेट फॅमिली बिझनेसमध्ये उतरला. सध्या तो Tips Industries चे Chief Operating Officer (COO) आहे.मीडिया रिपोर्ट्सनुसार त्याची आजची नेट वर्थ तब्बल 2164 कोटी रुपये आहे म्हणजेच कमाईत ते आमिर खान, रणबीर कपूर, वरुण धवन यांसारख्या टॉप अभिनेत्यांनाही खूप मागे टाकतोय.

Continues below advertisement

ओळखूही येणार नाही एवढा वेगळा दिसतोय 

गिरीशचा नुकताच समोर आलेला एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यातील त्यांचा लूक पूर्णपणे बदललेला दिसतो. त्यांना पाहून अनेक फॅन्सना विश्वासच बसला नाही “हा तोच ‘रमैया वस्तावैया’मधला गिरीश आहे?”त्यांचा हा ट्रान्सफॉर्मेशन लूक इंटरनेटवर चर्चेचा विषय ठरला आहे.