Girija Ook Husband Suhrud Godbole: मराठी अभिनेत्री गिरीजा ओक-गोडबोले (Girija Ook) हिची गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा सुरु आहे. मालिका, चित्रपट, नाटक, ओटीटी अशा माध्यमांमध्ये गिरीजा ओक हिने अभिनयाचा ठसा उमटवला आहे. गिरीजा ओक हिने एक मुलाखत दिली होती. या मुलाखतीमध्ये स्लीवलेस ब्लाउज, सुंदर साडी नेसली होती. गिरीजाच्या या लूकची चांगली चर्चा झाली आणि आता चाहते तिला न्यू नॅशनल क्रश म्हणून ओळखू लागली. गिरीजा ओकने 2007 मध्ये आमिर खानसोबत तारे जमीन पर या सिनेमात देखील काम केलंय. तसेच 2023 मध्ये शाहरुख खानच्या जवान या चित्रपटात देखील गिरीजा ओकने भूमिका साकरली आहे. दरम्यान, आता गिरीजा ओक हिचा पत्नी नेमका कोण आहे?, गिरीजा ओक हिचा पती काय करतो?, याबाबतची चर्चा सोशल मीडियावर सुरु आहे.
गिरीजा ओक हिचा पती कोण? (Girija Ook Husband Suhrud Godbole)
गिरीजा ओक यांचा विवाह सुहृद गोडबोले (Suhrud Godbole) यांच्याशी झाला आहे. 2011 मध्ये तिने सुहृद गोडबोलेशी लग्न केलं. सुहृद गोडबोले निर्माते आणि दिग्दर्शक आहेत. सुहृद गोडबोलेने 'पुणे 52' आणि 'बाजी' यांसारख्या मराठी चित्रपटांची निर्मिती केली आहे.
कोण आहे गिरीजा ओक? (Who Is Girija Ook)
गिरीजा ओक ही एक मराठी अभिनेत्री आहे. गिरीजा ओक मराठी अभिनेते गिरीश ओक यांची मुलगी आहे. तिने ठाकूर कॉलेज ऑफ सायन्स अँड कॉमर्स कांदिवली पूर्व, मुंबई येथून बायोटेक्नॉलॉजीमध्ये पदवी पूर्ण केली. तिने थिएटर वर्कशॉपमध्ये प्रवेश घेतला आणि जाहिरातींमध्ये अभिनय करण्यास सुरुवात केली. गिरीजा ओक यांचा विवाह सुहृद गोडबोले यांच्याशी झाला आहे. गिरीजा ओक 15 वर्षांची असताना मोठ्या पडद्यावर पदार्पण केले. 'गोष्ट छोटी डोंगराएवढी', 'गुलमोहर', 'मानिनी', आणि 'अडगुळं मडगुळं' या चित्रपटांत गिरीजा ओकने काम केले आहे. 'लज्जा' ही झी मराठी वरील मालिका तिची पहिली मालिका होती.