Gharoghari Matichya Chuli Marathi Serial Track:स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिका घरोघरी मातीच्या चुली (Gharoghari Matichya Chuli) सध्या प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. या मालिकेने अल्पावधीतच लोकप्रियतेचे शिखर गाठले असून आता कथा एका अत्यंत उत्कंठावर्धक टप्प्यावर पोहोचली आहे. मालिकेच्या आगामी भागांमध्ये प्रेक्षकांना जानकी आणि ऋषिकेशच्या नात्यात एक मोठं वादळ येताना पाहायला मिळणार आहे. हे वादळ आणणार आहे एक नवं पात्र मकरंद! (Marathi Serial)

Continues below advertisement

12 वर्षांपूर्वीच्या काळात जाणार मालिका (Marathi Serial)

कथेचा प्रवास आता 12 वर्षांपूर्वीच्या काळात जाणार आहे. या फ्लॅशबॅकमधून ऋषिकेश आणि जानकीच्या प्रेमकथेची सुरुवात, त्यांच्या नात्याचा प्रवास आणि त्यांच्या आयुष्यात आलेला मकरंद नावाचा व्यक्ती याचा सखोल मागोवा घेतला जाणार आहे. मकरंद हा शांत, संकोची पण अत्यंत बुद्धिमान स्वभावाचा आहे. त्याचं जानकीवर एकतर्फी प्रेम आहे. मनोमन तो तिला आपली पत्नी मानतो, पण तिचं ऋषिकेशवर असलेलं प्रेम त्याला अस्वस्थ करतं. त्यामुळे तो या नात्याचा सर्वात मोठा अडथळा बनतो. (Gharoghari Matichya Chuli Marathi Serial Track)

मालिकेनं  जिंकली प्रेक्षकांची मने 

या रहस्यमय व्यक्तिरेखेची भूमिका साकारत आहे सुप्रसिद्ध अभिनेता कश्यप परुळेकर. आपल्या दमदार अभिनयासाठी ओळखल्या जाणाऱ्या कश्यपने या भूमिकेतून पुन्हा एकदा प्रेक्षकांची मनं जिंकण्याची तयारी केली आहे. तो म्हणतो, “स्टार प्रवाहसोबत माझं नातं अगदी खास आहे. मन उधाण वाऱ्याचं पासून सुरू झालेला माझा प्रवास घरोघरी मातीच्या चुलीपर्यंत आला आहे. मकरंदची व्यक्तिरेखा अत्यंत वेगळी आणि भावनिक आहे. जानकीवरील त्याचं प्रेम, त्याची झुंज आणि त्याच्या भावना या सर्व गोष्टी साकारताना एक वेगळाच अनुभव येत आहे.”

Continues below advertisement

‘मास्क मॅन’चं गुपितही उलगडणार

मालिकेच्या पुढील भागांमध्ये प्रेक्षकांना फक्त जानकी-ऋषिकेश-मकरंद या त्रिकोणी नात्याचा संघर्षच नाही, तर ‘मास्क मॅन’चं गुपितही उलगडताना दिसणार आहे. हे रहस्य काय आहे, आणि त्याचा जानकी-ऋषिकेशच्या आयुष्यावर काय परिणाम होणार, हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. मालिकेचं कथानक भावनिक, नाट्यमय आणि रहस्यमय वळणांनी सजलेलं आहे. पात्रांमधील नाती, त्यांच्या भावना आणि संघर्ष यामुळे घरोघरी मातीच्या चुली ही केवळ मालिका न राहता एक भावनिक प्रवास बनली आहे. तेव्हा हा रंजक प्रवास अनुभवण्यासाठी सज्ज व्हा. पाहायला विसरु नका घरोघरी मातीच्या चुली सायंकाळी 7.30 वाजता फक्त स्टार प्रवाहवर.’