एक्स्प्लोर

Ghabadkund Trailer: अघोरी शक्तींचा पहारा आणि गुप्तधनाचा शोध; 'घबाडकुंड' चक्रव्यूहाचा थरारक ट्रेलर पाहिलात?

Ghabadkund Trailer: दिग्दर्शक प्रितम एस. के. पाटील यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं असून निर्माते डॉ. रसिक कदम यांची भक्कम साथ या प्रकल्पाला लाभली आहे.

Ghabadkund Trailer: मराठी सिनेसृष्टीत (Marathi Film Industry) प्रेक्षकांना सतत काहीतरी वेगळं आणि नावीन्यपूर्ण देण्याचा प्रयत्न होत असतो. याच धडपडीतून अनेक नवे प्रयोग मराठी चित्रपटांमध्ये पाहायला मिळत आहेत. आता अशाच एका आगळ्यावेगळ्या आणि धाडसी प्रयोगासह 'घबाडकुंड' सिनेमा (Ghabadkund Film) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून त्यातील रहस्य, भय आणि अनपेक्षित घडामोडी प्रेक्षकांची उत्सुकता वाढवणाऱ्या आहेत. ट्रेलरमधील प्रत्येक दृश्य थराराची पातळी उंचावत नेतं आणि शेवटपर्यंत प्रेक्षकांना खिळवून ठेवतं. धक्कादायक वळणं आणि अनपेक्षित रहस्यांनी भरलेला हा सिनेमा प्रत्येकाला एक मोठं 'सरप्राईज' देईल, असा विश्वास निर्माते डॉ. रसिक कदम यांनी व्यक्त केला आहे.

'घबाडकुंड'मधून कल्पनेच्या पलीकडचं एक वेगळंच 'युनिव्हर्स' मोठ्या पडद्यावर साकारण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. दिग्दर्शक प्रितम एस. के. पाटील यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं असून निर्माते डॉ. रसिक कदम यांची भक्कम साथ या प्रकल्पाला लाभली आहे. 'आयकॉन दी स्टाईल' प्रस्तुत मराठीतील पहिला सिनेमॅटिक युनिव्हर्स असलेला 'घबाडकुंड' हा बहुप्रतीक्षित सिनेमा येत्या 19 जून रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे.

रहस्यमय आणि गूढ गोष्टींबद्दल प्रत्येकाच्या मनात एक सुप्त आकर्षण असते. याच गूढतेचा आणि थराराचा अनुभव 'घबाडकुंड'मधून प्रेक्षकांना मिळणार आहे. या गूढ रहस्याचा उलगडा करण्यासाठी सहा जण एका धोकादायक प्रवासाला निघतात; मात्र या शोधयात्रेत त्यांच्यासमोर उभं राहतं भीती, थरार आणि अनाकलनीय घटनांचं भयावह वास्तव! 'घबाडकुंड' मध्ये नेमकं काय दडलं आहे? आणि या अंधाऱ्या गूढतेमागचं सत्य काय आहे? अशा प्रश्नांची उत्सुकता वाढवणारी कथा, रहस्यमय वातावरण आणि अंगावर काटा आणणाऱ्या थरारक घटनांनी सजलेला ‘घबाडकुंड’ प्रेक्षकांना एका वेगळ्याच अनुभवाच्या प्रवासावर घेऊन जाणार आहे.

रहस्य, भय, थरार आणि अनोख्या सिनेमॅटिक अनुभवाचा संगम असलेला 'घबाडकुंड' प्रेक्षकांना एका वेगळ्याच विश्वात घेऊन जाणार आहे. शशांक शेंडे,  संदीप पाठक, देवदत्त नागे, कुशल बद्रिके, प्राजक्ता हनमघर, स्मिता पायगुडे-अंजुटे, वैष्णवी कल्याणकर, रॉकी देशमुख, आरोही भोईर, योगेश प्रकाश तनपुरे, साहिल अनलदेवर आदि कलाकारांची दमदार फौज ‘घबाडकुंड’ चित्रपटात आहे.

'घबाडकुंड'मधील रहस्य, थरार आणि अनपेक्षित घडामोडी प्रेक्षकांना एका वेगळ्याच विश्वात घेऊन जातील. 19 जूनपासून हा अनोखा सिनेमॅटिक प्रवास मोठ्या पडद्यावर अनुभवण्यासाठी प्रेक्षकांनी नक्की चित्रपटगृहात यावे, असे आवाहन कलाकारांनी केलंय.

पाहा 'घबाडकुंड' सिनेमाचा ट्रेलर : 

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Don 3 Controversy Farhan Akhtar Ranveer Singh: 'डॉन 3'चा वाद चिघळला, रणवीर सिंहनं बॅन करणाऱ्या FWICE ला खेचलं कोर्टात, इंडस्ट्रीत खळबळ माजवणाऱ्या वादात कुणाचं पारडं जड?

ABP माझाच्या बातम्या LIVE... 

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pranit More 370 Biryani: 'जेव्हा कुणाचा तरी मृतदेह...'; '370 बिर्याणी' प्रकरणात मुनव्वर फारुकीची उडी, प्रणित मोरेच्या सपोर्टमध्ये म्हणाला..
'जेव्हा कुणाचा तरी मृतदेह...'; '370 बिर्याणी' प्रकरणात मुनव्वर फारुकीची उडी, प्रणित मोरेच्या सपोर्टमध्ये म्हणाला..
Sanchita Ugale Ends Life: संचिता उगलेच्या फोनमध्ये नक्की काय सापडलं? डॉक्टरांना चॅटमध्ये म्हणाली, 'लोक मला घाबरतात, गेले 6 महिने..'
संचिता उगलेच्या फोनमध्ये नक्की काय सापडलं? डॉक्टरांना चॅटमध्ये म्हणाली, 'लोक मला घाबरतात, गेले 6 महिने..'
Lagaan Bagha Fame Actor Statement: अमीर खानच्या 'लगान'ने माझं करियर बरबाद केलं; 25 वर्षांनतर 'बाघा' फेम अभिनेता स्पष्टच बोलला..
अमीर खानच्या 'लगान'ने माझं करियर बरबाद केलं; 25 वर्षांनतर 'बाघा' फेम अभिनेता स्पष्टच बोलला..
Sonu Nigam: सोनू निगम देतोय गंभीर आजाराशी झुंज; घसा बसला अन्...कॉन्सर्टपूर्वी गायकानं VIDEO शेअर करत सगळंच सांगितलं
सोनू निगम देतोय गंभीर आजाराशी झुंज; घसा बसला अन्...कॉन्सर्टपूर्वी गायकानं VIDEO शेअर करत सगळंच सांगितलं
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Ambadas Danve On Operation Tiger : दम असेल तर निवडून आणा, दुसऱ्यांची पोरं का लागतात
Nitin Deshmukh On Operation Tiger : फुटणाऱ्यांना लाज वाटू दे, मशालीवर निवडून आलात
Operation Tiger : ऑपरेशन टायगर - दिल्लीत हालचालींना वेग, एकनाथ शिंदे आणि UBT खासदार दिल्लीत
Maharashtra Operation Tiger : ठाकरेंचे सहा खासदार शिंदेंच्या गळाला? कोण कुठे आहे? आत्ताची मोठी अपडेट
Raju Waghmare On Operation Tiger Zero Hour : २०२९ पर्यंत उद्धव ठाकरे यांचा पक्ष संपलेला असेल? | Zero Hour
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
OmRaje Nimbalkar: 'गद्दारीचा शिक्का लावून घेऊ नका साहेब' ओमराजे निंबाळकरांच्या फेसबूक पोस्टवर शिवसैनिकांच्या कमेंट्सचा पाऊस; शिवसेना पक्षप्रवेशाच्या चर्चेला उधाण
'गद्दारीचा शिक्का लावून घेऊ नका साहेब' ओमराजे निंबाळकरांच्या फेसबूक पोस्टवर शिवसैनिकांच्या कमेंट्सचा पाऊस; शिवसेना पक्षप्रवेशाच्या चर्चेला उधाण
'समाजवादी पक्षात मोठी फूट पडणार, अमित शाहाजींना चिट्टी पाठवली आहे... ' थेट मंत्र्यानं केला दावा; आप, तृणमुलनंतर ठाकरे शिवसेनेंतर आता समाजवादी पक्षाचा नंबर?
'समाजवादी पक्षात मोठी फूट पडणार, अमित शाहाजींना चिट्टी पाठवली आहे...' मंत्र्यानं केला दावा; आप, तृणमुलनंतर ठाकरे शिवसेनेंतर आता समाजवादी पक्षाचा नंबर?
Sushma Andhare :
"ओमराजेंनी फोन उचलला नाही, कैलास पाटील म्हणाले मी स्वतःची गॅरंटी देतो पण..."; सुषमा अंधारेंचा पुण्यात खळबळजनक खुलासा, विमानात कोण होतं त्यांची नावं...
Vaibhav Sooryavanshi IND A vs AFG A : वैभव सूर्यवंशीमुळे पुन्हा मैदानावर रंगला वाद! अफगाण खेळाडू अंपायरवरच धावले, दुसऱ्याच षटकात नेमकं काय घडलं? सगळे हादरले
वैभव सूर्यवंशीमुळे पुन्हा मैदानावर रंगला वाद! अफगाण खेळाडू अंपायरवरच धावले, दुसऱ्याच षटकात नेमकं काय घडलं? सगळे हादरले
Pranit More 370 Biryani: 'जेव्हा कुणाचा तरी मृतदेह...'; '370 बिर्याणी' प्रकरणात मुनव्वर फारुकीची उडी, प्रणित मोरेच्या सपोर्टमध्ये म्हणाला..
'जेव्हा कुणाचा तरी मृतदेह...'; '370 बिर्याणी' प्रकरणात मुनव्वर फारुकीची उडी, प्रणित मोरेच्या सपोर्टमध्ये म्हणाला..
Ind vs Afg 2nd ODI LIVE Update : अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकली, टीम इंडियात एक-दोन नाही तर तब्बल 3 मोठे बदल, जाणून घ्या प्लेइंग-11
Ind vs Afg 2nd ODI LIVE Update : अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकली, टीम इंडियात एक-दोन नाही तर तब्बल 3 मोठे बदल, जाणून घ्या प्लेइंग-11
ठाकरेंचे खासदार फुटले, गटही स्थापन झाला; आता प्रतीक्षा 19 जूनच्या ऐतिहासिक वर्धापन दिनाची!
ठाकरेंचे खासदार फुटले, गटही स्थापन झाला; आता प्रतीक्षा 19 जूनच्या ऐतिहासिक वर्धापन दिनाची!
Prakash Waje Shivsena : विकासनिधी शब्द वापरून राजाभाऊंना मोठा ऑफर; दीड वर्षांपूर्वी ठाण्यातही बोलावलं अन्....; वडील प्रकाश वाजेंनी सगळंच सांगितलं!
विकासनिधी शब्द वापरून राजाभाऊंना मोठा ऑफर; दीड वर्षांपूर्वी ठाण्यातही बोलावलं अन्....; वडील प्रकाश वाजेंनी सगळंच सांगितलं!
Embed widget