Genelia Deshmukh and Riteish Deshmukh: सिनेसृष्टीतील 'लय भारी' (Lai Bhaari) जोडींपैकी एक म्हणजे रितेश देशमुख (Riteish Deshmukh) आणि जिनेलिया देशमुख (Genelia Deshmukh). महाराष्ट्राचे दादा - वहिनी असं त्यांना म्हटलं जातं. नुकताच, त्यांचा 'राजा शिवाजी' हा सिनेमा रिलीज झाला होता. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली. 'राजा शिवाजी' (Raja Shivaji) या सिनेमाने 100 कोटींचा टप्पा ओलांडला. तसेच या सिनेमाने मराठी बॉक्स ऑफिसवरील अनेक रेकॉर्ड्स मोडले.  दोघांचा हटके अंदाज त्यांच्या चाहत्यांना भावतो. दोघांकडे आदर्श जोडी म्हणून पाहिले जाते.  'लय भारी',  'राजा शिवाजी' या मराठी सिनेमात रितेश देशमुख आणि जिनेलिया देशमुख ही जोडी दिसली होती. या क्यूट कपलला प्रेक्षकांकडून जबरदस्त रिस्पॉन्स मिळतो. दोघेही बऱ्याच रिलेशनशिप टिप्स देताना दिसतात. एका मुलाखतीत जिनेलिया देशमुखला, 'रितेश भाऊंनी तुम्हाला कोणता पहिला मराठी सिनेमा दाखवला होता?', असा प्रश्न विचारला. यावर जिनेलिया देशमुखने, 'जोगवा सिनेमा', असं उत्तर दिलं.

Continues below advertisement

रितेश देशमुखने जिनेलिया देशमुखला पहिला कोणता मराठी सिनेमा दाखवला होता? (Genelia Deshmukh and Riteish Deshmukh first marathi movie)

 

मराठी फिल्म फेस्टिव्हलला दिलेल्या मुलाखतीत, 'रितेश भाऊंनी जेनिलियाला पहिला कोणता चित्रपट दाखवला', असा प्रश्न अभिनेत्रीला विचारण्यात आला. तेव्हा जेनिलिया म्हणते, 'जोगवा. असा ऑन्थेंटिक सिनेमा मी कधीच पाहिला नव्हता'. यानंतर रितेश देशमुख म्हणतो, 'आम्ही जोगवा सिनेमा पाहिला. एवढा सुंदर हा सिनेमा तयार करण्यात आला. या सिनेमाचे दिग्दर्शक  राजीव पाटील यांना मी कॉल केला.  त्यांच्या सिनेमाचं कौतुक केलं. फार छान आहे चित्रपट, असं म्हणालो. मी तेव्हापर्यंत मराठी सिनेइंडस्ट्रीत काम केलं नव्हतं. तेव्हा मी त्यांना म्हणालो होतो की, मराठी इंडस्ट्रीत काम करायचं आहे, करूयात का?'.

'पहिले दिग्दर्शक, ज्यांच्याबरोबर मी काम करण्याची इच्छा व्यक्त केली.. ते म्हणजे राजीव पाटील. पुढे आम्ही एकत्र कामही केलं.  पण दुर्देवाने आज ते आपल्यात नाहीत. नंतर 'लय भारी' हा चित्रपट झाला', असं रितेश देशमुख म्हणाला.   सध्या त्यांची ही मुलाखत सोशल मीडियात व्हायरल होत आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या:

रुपेरी पडद्यावर मायलेकीची जुगलबंदी; 'द्विधा'मध्ये प्रसिद्ध अभिनेत्री मानसी कुलकर्णीसोबत तिची लेकही झळकणार