Gen Zs Movie Magazine First Look Release: आजची Gen Z (Generation Z) पिढी जगभरात फिरते, स्वतःची ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न करते. पण या सगळ्या प्रवासात या पिढीच्या मनात एक प्रश्न निर्माण होतो, “आपलं खरं घर नेमकं कुठे आहे?” . या इमोशनला, एका समकालिन आणि तरुणाईंच्या दृष्टिकोनातून पडद्यावर मांडणारा आगामी मराठी सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. ‘मॅगझिन’ (Magazine First Look) असे चित्रपटाचे नाव असून, हा सिनेमा 23 ऑक्टोबर 2026 रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. सध्या या सिनेमाच्या पोस्टरची विशेष चर्चा होत आहे.
‘मॅगझिन’ मराठी सिनेमाचा लक्षवेधी पोस्टर रिलीज (Gen Zs Movie Magazine First Look Release Search for Home and Identity)
Gen Zच्या बदलत्या विश्वाची झलक या सिनेमातून दाखवण्यात येणार आहे. ‘मॅगझिन’ या सिनेमाचा पोस्टर नुकताच रिलीज करण्यात आला आहे. तरुणाईंशी थेट संवाद साधणारा ‘मॅगझिन’ या सिनेमाच्या पोस्टरने प्रदर्शनापूर्वीच सर्वांचच लक्ष वेधून घेतलं आहे. ‘मॅगझिन’ ही केवळ Gen Z या पिढीची गोष्ट नाही, तर Gen Z पिढीला समजून घेण्याचा प्रयत्न करणारा सिनेमा आहे. विशेष म्हणजे या सिनेमातून जुन्या तसेच नव्या पिढ्यांमधला संवाद घडवून आणण्याचा प्रयत्न आहे.
खरंतर आजची Gen Z ही पिढी करिअर, नाते आणि आयुष्याच्या विविध वाटा निवडत असते. अशातच ‘घर’, ‘आपली माणसं’ आणि ‘आपली मुळं’ यांच्याशी त्यांचं नातं नेमकं कसं बदलत असतं, या गोष्टी सिनेमातून दाखवण्यात येणार आहे. चित्रपटाच्या कथेचे अनेक पैलू निर्मात्यांनी अद्याप उघड केलेले नाही. मात्र, पोस्टरमधून हा प्रवास केवळ एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्याचा नसून स्वतःचा शोध घेण्याचा असल्याचं पोस्टरमधून स्पष्ट होतं.
या खास सिनेमाचे दिग्दर्शन शुभम संजय शेवडे यांनी केले आहे. तर, या सिनेमात मुख्य भूमिका राघव वर्तक याची आहे. ‘मॅगझिन’ यंदाच्या दिवाळीत एक वेगळा अनुभव देण्यास सज्ज होणार आहे. हा सिनेमा 23 ऑक्टोबर 2026 रोजी सिनेमागृहात रिलीज होणार आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या:
