Gautami Patil Video : नृत्यांगणा गौतमी पाटील (Gautami Patil Video) सोशल मीडियावर नेहमी चर्चेत असते. तमाशा ही महाराष्ट्रातील लोककला म्हणून ओळखली जाते. मात्र, गौतमीने (Gautami Patil Video) डान्सर पासून सुरु केलेला प्रवास आता महाराष्ट्रातील बड्या सेलिब्रिटीपर्यंत पोहोचलाय. गौतमी पाटील (Gautami Patil Video) आता मनोरंजन क्षेत्रातील मोठं नाव बनलंय. सिनेमा, गाणी किंवा मराठी टिव्ही मालिका प्रत्येक ठिकाणी गौतमी पाटील झळकलेली पाहायला मिळत आहे. याशिवाय महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात तिच्या डान्स शोची मागणी कमी झालेली नाही.
दरम्यान, आता गौतमी पाटील सध्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केलाय. गौतमी पाटील Nusrat Fateh Ali Khan यांच्या Afreen Afreen या गाण्यावर तिच्या खास अदा करुन दाखवत आहे. यावेळी ती तिच्या नॉर्मल लूकमध्ये पाहायला मिळत आहे. तिच्या हाती एक फुल देखील आहे. गौतमीने Nusrat Fateh Ali Khan यांच्या गाण्यावर सादर केलेल्या खास अदा प्रेक्षकांना भुरळ पाडत आहेत. गौतमी पाटीलने शेअर केलेल्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी लाईक आणि कमेंट्सचा पाऊस पाडलाय.
गौतमी पाटील हे नाव आज महाराष्ट्रात घराघरात पोहोचलेलं आहे. आपल्या खास नृत्यशैलीने, उत्साही अभिनयाने आणि मंचावरील ठसकेबाज उपस्थितीने तिने लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. तिच्या डान्स व्हिडीओंनी सोशल मीडियावर प्रचंड लोकप्रियता मिळवली. नृत्यानंतर गौतमीने अभिनयाच्या क्षेत्रातही पाय रोवायला सुरुवात केली. तिने काही सिनेमांमध्ये तिने अभिनय केला. याशिवाय गौतमी पाटील 2023 आणि 2024 मध्ये काही मराठी म्युझिक व्हिडीओंमध्ये गौतमी प्रमुख भूमिकेत झळकली. मालिकांमध्ये देखील तिचा सहभाग दिसून आला आहे. जरी गौतमीने अजून कोणत्याही प्रमुख मालिकेत मुख्य भूमिका केली नसेल, तरी विशेष भाग, नृत्य सादरीकरण किंवा अतिथी कलाकार म्हणून तिने झळकून लोकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. सध्या झी मराठीवरील देवमाणूस या मालिकेत गौतमी पाटील डान्सरच्या भूमिकेत पाहायला मिळत आहे.
दरम्यान, तिच्या डान्स क्षेत्रातील कारकीर्दीमध्ये वादही आले. काही प्रसंगांमध्ये तिच्यावर टीका झाली, सोशल मीडियावर ट्रोलिंग झाली. पण या सगळ्या गोष्टींना सामोरं जात तिने आपली कारकीर्द प्रगतीपथावर ठेवली. आज ती महाराष्ट्रभर कार्यक्रमांसाठी मागणी असलेली कलाकार बनली आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
VIDEO : सुंदरा, नखरा तुझा लय खत्रा, गौतमी पाटीलचा खास डान्स; शेअर केला व्हिडीओ