(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Gautami Patil : गडकिल्ल्यांवर जाण्याची लायकी नाही अन्..., गौतमीच्या 'आलं बया दाजी माझं' गाण्याच्या व्हिडिओवर नेटकरी संतापले
Gautami Patil : गौतमी पाटील हिच्या एका व्हिडिओवर नेटकऱ्यांनी कमेंट करुन ट्रोल केल्याचं पाहायला मिळालं आहे. तसेच सोशल मीडियावरुन बराच संतापही व्यक्त केला जात आहे.
Gautami Patil : सबसे कातील गौतमी पाटील (Gautami Patil) हिची क्रेझ संपूर्ण महाराष्ट्रभर आहेत. तिच्या प्रत्येक गाण्याला चांगली पसंती मिळते. इतकचं नव्हे तर महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात आणि शहरी भागातही गौतमीचा चाहतावर्ग फार मोठा आहे. त्यामुळे ती आता सगळ्यांची लाडकी झाली आहे. पण इतकं असूनही अनेकदा तिला ट्रोलिंगलाही सामोरं जावं लागतं. नुकतच गौतमीचं एक नवं गाणं प्रेक्षकांच्या आलं आहे. आलं बाई दाजी माझं असं या गाण्याचं नाव आहे. पण या गाण्याच्या एका व्हिडिओमुळे गौतमीला नेटकऱ्यांनी चांगलच ट्रोल केल्याचं पाहायला मिळतंय.
गौतमी या गाण्यात गाण्यावर पांरपारिक वेषात डान्स करताना दिसत आहे. तिने तिच्या शुटींगचा बीटीएस व्हिडिओ पोस्ट केल्याचं पाहायला मिळतंय. पण एरवी तिच्या गाण्यांचं कौतुक करणारे रसिक प्रेक्षक यावेळी मात्र तिच्या गाण्यावर काहीसे नाराज असल्याचं पाहायला मिळालं. पण गौतमीवर प्रेक्षकांनी नाराजी का व्यक्त केली याविषयी सविस्तर जाणून घेऊयात.
गौतमीवर नेटकरी का संतापले
गौतमीवर नेटकरी बरेच संतापल्याचं पाहायला मिळालं कारण तिने या गाण्याचं शुटींग एका किल्ल्यात केलं असल्याचं पाहायला मिळतंय. या व्हिडिओमध्ये किल्ल्याचा काही भाग दिसत आहे. त्यामुळे तिच्यावर नेटकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. तिच्या या व्हिडिओवर कमेंट करत लोकांनी म्हटलं की, . ‘छान अशीच वाढवा आमच्या गडकिल्ल्यांची शोभा’, ‘शिवाजी महाराजांची थोडीशी तरी इज्जत ठेवा’,'गड किल्ल्यांवर अशी गाणी करणे अयोग्य आहे .दुसरी ठिकाणं मिळाली नाही का?''गडकिल्ल्यावर जाण्या इतकी लायकी नाही तुमची आणि तिथे डान्स काम करताय यांचा जाहीर निषेध', अशा आशयाच्या कमेंट्स केल्या आहेत.
View this post on Instagram
गौतमी पाटील कायमच चर्चेत!
गौतमी पाटील नेहमीच चर्चेत असते. एकीकडे तिच्यावर जोरदार टीका होत असली तरी तिला पाठिंबा देणारी मंडळी कमी नाहीत. आपल्या नृत्य सादरीकरणात अश्लील इशारा करत असल्याने तिच्यावर प्रचंड टीका झाली. त्यानंतर गौतमीनेदेखील सर्वांची माफी मागत चूक सुधारणार असल्याचं सांगितलं. गौतमीच्या कार्यक्रमांना पुरुष चाहत्यांप्रमाणे महिलावर्गदेखील मोठ्या संख्येने उपस्थित असतो. गौतमीचा 'घुंगरू' हा मराठी सिनेमा काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. बॉक्स ऑफिसवर जादू दाखवण्यात हा सिनेमा कमी पडला. पण या सिनेमाच्या माध्यमातून गौतमीने अभिनयक्षेत्रात पदार्पण केलं.
ही बातमी वाचा :