Gautami Patil Opens Up About Her Ideal Life Partner: लाखो दिलो की धडकन म्हणजे गौतमी पाटील. अनेक दिलाची व्हॅलेन्टाईन म्हणून तिची ओळख. तिनं कमी कालावधीत प्रसिद्धी मिळवली. तिच्या अदा, ठुमके आणि सोज्वळ रूपावर प्रत्येक जण घायाळ आहे. गौतमी केवळ आपल्या लावणी सादरीकरणासाठी नसून, वैयक्तिक आयुष्यामुळेही प्रचंड चर्चेत असते. आज सर्वत्र व्हॅलेन्टाईन्स डे साजरा केला जात आहे. गौतमीचा नेमका व्हॅलेन्टाईन कोण? तिला साथीदार नेमका कसा हवा आहे? असे अनेक प्रश्न तिच्या चाहत्यांकडून उपस्थित केले जातात. याच प्रश्नांवर गौतमीने खास व्हॅलेन्टाईन्स डे स्पेशल, एबीपी माझाच्या कॉफी विथ कौशिक या पॉडकास्टमध्ये खुलासा केला.
गौतमी पाटीलचा व्हॅलेन्टाईन कोण? व्हॅलेन्टाईन वीक कसा साजरा करतेय? असा तिला प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नावर उत्तर देताना गौतमी म्हणाली, "माझा अजिबात कुणीही व्हॅलेन्टाईन नाहीये. सध्या माझे कार्यक्रमच सुरू आहेत. व्हॅलेन्टाईन डे असं काही मी सध्या साजरा करत नाहीये. यात मला खरंतर इंटरेस्ट नाही आहे", असं गौतमी म्हणाली. व्हॅलेन्टाईन डे नेमका कसा साजरा करण्यात यावा? असा प्रश्न गौतमीला प्रश्न विचारण्यात आला, तेव्हा गौतमी म्हणाली, "कुठेतरी फिरायला जायचं, एकत्र जेवण करून, एकमेकांसाठी आम्ही वेळ देऊ.. एवढं ठीक आहे", असं गौतमी म्हणाली. गौतमीचा व्हॅलेन्टाईन व्यक्ती नेमकी कशी असावी, या प्रश्नावर उत्तर देताना गौतमी म्हणते, "माझा पार्टनर नेहमी समजूतदार असावा. आतापर्यंत माझ्या आयुष्यात बऱ्याच गोष्टी घडल्या आहेत. माझ्या भूतकाळाला एक्सेप्ट करणारी असावी. अशी माझी अपेक्षा आहे".
लग्नाबाबत गौतमीनं "एवढ्या लवकर मी लग्न करणार नाही. म्हणून व्हॅलेन्टाईन डे पण नंतर साजरा करणार", असं उत्तर दिलं. लग्न का लवकर करणार नाही? या प्रश्नावर गौतमी म्हणते, "आपल्या करिअरची सुरूवात आता झाली आहे. मी आता सिनेसृष्टीत पाऊल ठेवलं आहे. मला असं वाटतं, की या गोष्टीत मी आता नाही पडलं पाहिजे. करिअरच्या बाबतीत आणखी काही गोष्टी करून, पुढे लग्न करेन.. हे मला बेस्ट वाटतं", असं गौतमी म्हणाली. प्रोपोजलवर खुलासा करत गौतमी म्हणाली, "मला सोशल मीडियावर बरेच प्रोपोजल येतात. आता म्हणतील की, ही बघते मेसेज पण रिप्लाय करत नाही. आय लव्ह यू गौतमी, असे चाहत्यांचे मेसेज असतात. हे प्रेक्षकांचं प्रेम आहे. कार्यक्रमात काहींनी लग्नाचीही मागणी घातली आहे", असं गौतमी म्हणाली.