Gautami Patil: महाराष्ट्रात गौतमी पाटील हे नाव म्हणजे अनेकांच्या जिव्हाळ्याचा विषय. तरुणापासून राजकारण्यांपर्यंत गौतमी पाटील हे नाव प्रचंड लोकप्रिय आहे. सबसे कातिल गौतमी पाटील अशी ओळख मिरवणाऱ्या गौतमीचा एकही हाऊसफुल्ल झाला नाही, असं होत नाही.लावणी, अदा या सगळ्या गोष्टींप्रमाणे गौतमी वादांमुळेही अनेकदा चर्चेत आलीय.लग्न, valentine, राधा पाटील, तिच्या करियरविषयीच्या सगळ्या विषयांवर गौतमी बोललीय. ती एबीपी माझाच्या podcast वर आली होती त्यावेळी तिनं अनेक विषयांवर मनमोकळ्या गप्पा मारल्या.
गौतमी पाटील नंतर आणखी एक लावणी नृत्यांगना चर्चेत आली. ती म्हणजे राधा पाटील मुंबईकर. बिग बॉस मराठीच्या घरात राधा पाटीलने एन्ट्री मारली आणि सगळ्या महाराष्ट्रात एकच चर्चा झाली. पण बिग बॉसच्या घरात जाण्यापूर्वी तिने एका मुलाखतीत राधा पाटीलने गौतमीवर टीका केली होती. बिग बॉसच्या घरात एन्ट्री घेताच गौतमी असो व कोणीही मी घाबरत नाही असं राधा म्हणाली होती. दरम्यान, एबीपी माझाच्या पॉडकास्टमध्ये गौतमीला राधा पाटील विषयी विचारण्यात आलं त्यावेळी तिनं राधा पाटीलच्या टीकेवरही उत्तर दिलय.
काय म्हणाली गौतमी पाटील ?
बिग बॉस पाहतेस का असं विचारल्यावर गौतमीने हो असं उत्तर दिलं. ती म्हणाली," काम करत असताना मध्ये मध्ये बिग बॉसचे रील पाहत असते . खरंतर रियल पाहतानाच घरात काय चाललंय हे कळत राहतं आपल्याला.'
राधा पाटील जी तुझ्यासोबत होती ती बिग बॉस मध्ये गेली. राधा पाटीलचा एवढा का तुझ्यावर राग ? असा प्रश्न गौतमीला विचारण्यात आला . त्यावर गौतमी म्हणाली ' मलाही ही गोष्ट माहिती नाहीये खरंतर. तिचा एवढा का राग आहे हे मला नाही माहित . पण मी या गोष्टी कधीच मनावर नाही घेत. आजवरही घेतल्या नाहीत. आणि इथून पुढेही घेणार नाही. मी कायम म्हणते की कितीही लोकांना काहीही बोलायचं असेल ते बोलू दे. मला फरक पडत नाही. मी हे मी कायम म्हणत असते त्यामुळे मला या गोष्टीचा काहीच फरक पडला नाही . ती जे काही बोलली असेल त्यावरून एवढं कळतं की जे आपल्यावर प्रेम करतात, जे आपल्या चाहते असतात ते छान कमेंट्स करत उत्तर देतात. ते बघूनच मला अजून छान वाटलं की आपल्याला बोलायची गरज पडली नाही. आपला चाहता वर्ग एवढा आहे की आपल्या वतीने तेच उत्तर देतात. त्यामुळे मला वाटत नाही की मी या सगळ्या गोष्टींकडे लक्ष द्यावं.
ती पुढे म्हणाली " लक्ष दिलं की काय होतं की एखादा ट्रोल करतो आणि आपण त्या गोष्टींमध्ये खचून जर गेलो तर ते काहीही उपयोगाचे नाही.म्हणून मला असं म्हणायचं आहे की जे ट्रॉल होतात त्यांनी ही गोष्ट हलक्यातच घ्यायला हवी .ट्रोलिंगच्या बाबतीत मला आता एक सवय झाली आहे की मला अजून ट्रोल करा मग मला छान वाटतं. मला तर इतका फरक पडेल असा झालाय की रोलिंग ऐकू नाही 'अच्छा असं म्हणाली का ती ' ठीक आहे .. इतकं नॉर्मल झाला आहे.
गौतमी पाटील स्वार्थी? टिकेवर दिलं उत्तर
गौतमी पाटील स्वार्थी आहे, आपल्या सोबत काम करणाऱ्यांना ती पुढे जाऊ देत नाही असं काहीजण म्हणतात. यावरही गौतमीने उत्तर दिलं. ती म्हणाली ' असं अजिबात नाही. उलट ज्यावेळेस आमचा डान्स चालू असतो, मला सांगितलं त्यावेळी जर मला खालून कोणी सांगितलं की 'ती मुलगी छान नाचतेय ' त्यावेळी मी तिला जवळ घेऊन पुढे नेते. मी तिला सांगते प्रेक्षकांना हाय कर..प्रतिसाद दे...उलट त्या मुलींना मी सपोर्ट करते. तुम्ही कधीही कुठल्याही माझ्या पोरींना विचारलं ना ..तरी त्या तुम्हाला आवर्जून सांगतील ताई कशी आहे. आणि कसं असतं माहिती का ? आज तुम्ही माझ्यासोबत आहेत. आज तुम्ही मला भेटलात तर तुम्हाला माझा स्वभाव कळेल. मी ज्यांच्या सोबत वावरले आहे, ज्यांना भेटले आहे त्यांना माहितीये गौतमी कशी आहे. असं गौतमी पाटील म्हणाली.
