Gautami Patil Krishna Sawala Re: आपल्या कातिलाना अदातून प्रेक्षकांना मोहित करणारी महाराष्ट्राची लाडकी नृत्यांगणा गौतमी पाटीलचा (Gautami Patil) चाहतावर्ग खूप मोठा आहे.  तिला आपल्या दिलखेचक अदांमुळे अल्पावधितच लोकप्रियता मिळाली.  गौतमी सोशल मीडियातही (Social Media) खूप सक्रीय असते. तिच्या पोस्टवर चाहते फिदा होतात.   तिनं आपल्या संपूर्ण कारकि‍र्दीत केवळ स्टेज परफॉर्मेंस केला नसून, अनेक  साँग अल्बमसाठीही (Album Song) काम केलं. तिचे गाणे प्रचंड फेमस होतात.  नुकतंच गौतमीनं आपल्या चाहत्यांना सोशल मीडियात पोस्ट शेअर करुन खास सरप्राईज दिलं आहे. गौतमीचं आगामी गाणं 'श्री कृष्ण सावळा रे' प्रेक्षकांच्या भेटीस आलं आहे.  हे गाणं म्हणजे भक्ती, प्रेम तसेच समर्पणाचे सुंदर संगम आहे.   या गाण्यात राधिकेच्या कृष्णाप्रती असलेल्या भावना अगदी सुंदररित्या मांडण्यात आल्या आहेत. गौतमीचं आगामी गाणं युट्यूबवर रिलीज करण्यात आलं असून,  मंत्रमुग्ध करणाऱ्या या गाण्याला प्रेक्षकांकडून भरभरुन प्रतिसाद मिळत आहे. 

Continues below advertisement

गौतमी पाटील नव्या गाण्यामुळे चर्चेत

भगवान कृष्ण आणि राधिकेवर आजवर  अनेक गाणी आणि चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. आता 'कृष्ण सावळा रे' या गाण्यातून राधिकेच्या कृष्णाप्रति असलेल्या भावना व्यक्त करण्यात आलं आहे. राधिकेच्या नजरेतून  कृष्णाप्रति असलेली प्रेम भावना या गाण्यातून सुंदररित्या  मांडण्यात आली आहे.   या मंत्रमुग्ध गाण्यात गौतमीनं सुंदर नृत्य सादर केलं आहे. तिनं या गाण्यात राधिकेच्या भावना प्रभावीपणे मांडले आहे.   तिच्या  नृत्यातून राधिकेच्या कृष्णाप्रति असलेल्या भावना स्पष्टपणे दिसून येतात.

गौतमी पाटीलचं नजरेत भरणारं सादरीकरण

या  गाण्यात गौतमीच्या नृत्याला अधिक खुलवण्याचं काम सिनेनृत्यदिग्दर्शक देवेंद्र शेलार यांनी केलं आहे. तसेच या गाण्याची निर्मिती   संदेश विठ्ठल गाडेकर आणि सुरेश विठ्ठल गाडेकर यांनी केली आहे. या गाण्याचे बोल अवंतिका बहिरट यांनी लिहिले असून,   या ह्रदयस्पर्शी शब्दांना आदित्य पाटेकर यांच्या सुरेल संगीताची जोड लाभली आहे.   तर, या गाण्याचे दिग्दर्शन प्रसिद्ध छायाचित्रकार  तेजस नेरुरकर यांनी केलं आहे.  तर, सोनाली सोनावणे आणि आदित्य पाटेकर यांच्या सुरेल  आवाजामुळे  या गाण्याला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवले आहे. 

Continues below advertisement

 

या गाण्यात गौतमी पाटीलने  नजरेत भरणारं सादरीकरण केलं आहे. पारंपारिक वेशभूषा आणि दागिन्यांमध्ये गौतमी पाटील सुरेख दिसत होती.  महाराष्ट्रीयन पद्धतीने तयार केलेल्या या गाण्यात गौतमी  पाटीलचं सादरीकरण अधिक उठावदार दिसत आहे.  या गाण्याबद्दल नृत्यदिग्दर्शक तेजस नेरुरकर म्हणतात,  'श्री राधिकाजींच्या नजरेतून श्रीकृष्ण  कायम प्रेमळ, खट्याळ आणि मोहक वाटतात. तरीही त्यांच्यात काहीतरी गुढ लपलेले आहे.  हीच जादू आपल्याला या गाण्यातून अनुभवता येईल'.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

Gaurav More Wife: गौरव मोरेची बायको आहे तरी कोण? थेट साऊथ सुपरस्टारसोबत स्क्रीन शेअर, बॉलिवूड दिग्दर्शकासोबतही केलंय काम