कातिल गौतमी मुंडावळ्यांमध्ये! हास्यजत्रेतील विनोदवीरासोबत गुपचूप लग्न? सर्वांसमोर लाजेने लाल, उखाणा घेत म्हणाली...
गडद हिरव्या रंगाची साडी, दागिने आणि मुंडावळ्यांमध्ये उभी असलेली गौतमी सगळ्यांना बघून लाजेने लालेलाल झालेली दिसते.

Gautami patil: महाराष्ट्राचे कातिल लावणीसम्राज्ञी गौतमी पाटीलही कोणत्या ना कोणत्या कारणातून कायम चर्चेत असते. काही दिवसांपूर्वी गौतमी 'एबीपी माझा'ला दिलेल्या खास मुलाखतीत आपल्या वैयक्तिक आयुष्यातील अनेक गोष्टींवर मनमोकळेपणाने बोललेली. लग्नाबद्दल, प्रियकराबद्दल आणि करिअरवरही ती बोलली होती. आता गौतमी पाटील चक्क मुंडावळ्यांमध्ये दिसली आहे. तिच्याकडे प्रेमाने पाहणारा नवरदेव हास्य जत्रेतील विनोदवीर आहे. दोघेही मुंडावळ्या आणि पारंपरिक विषयात दिसत आहेत. गडद हिरव्या रंगाची साडी, दागिने आणि मुंडावळ्यांमध्ये उभी असलेली गौतमी सगळ्यांना बघून लाजेने लालेलाल झालेली दिसते. सर्वांसमोर तिने उखाणाही घेतलाय. तिने सोशल मीडियावर शेअर केलेला हा व्हिडिओ बघता बघता व्हायरल झाला आहे. गौतमी पाटीलने गपचूप लग्न उरकलं की काय? अशी चर्चा रंगली. पण तिची पोस्ट पाहिल्यानंतर कळतंय की हास्यजत्राफेम ओंकार राऊत याच्यासोबत गौतमीने गाण्याचा व्हिडिओ शेअर केलाय.
गौतमी पाटीलचा व्हिडिओ व्हायरल
गौतमी पाटील कायम कोणत्या ना कोणत्या कारणातून चर्चेत येत असते. कधी वैयक्तिक तर कधी व्यवसायिक. सध्या गौतमी तिच्या एका व्हिडिओमुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. गडद हिरव्या रंगाची साडी, डोक्यावर मुंडावळ्या आणि बाजूला उभारलेला नवरदेव असा एक व्हिडिओ तिने तिच्या सोशल मीडियावर शेअर आहे. हाय का गाण्याचा व्हिडिओ असून यात महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम ओमकार राऊतही दिसला आहे.
व्हिडिओमध्ये गौतमी आणि ओंकार यांनी लग्न केलेलं दिसतंय. गौतमी गृहप्रवेश करते आणि सगळे तिला नाव घ्यायला सांगतात. त्यावर गौतमी म्हणतेय, 'ना वायफाय ना इंटरनेट, गच्चीवर झाली आमची पहिली भेट...ओंकार रावांचं नाव घेते आमची जोडी एकदम परफेक्ट'.... गौतमीने उखाणा घेताच सगळेजण तिचं कौतुक करताना दिसत आहेत.
गच्चीवरून कशी दिसते.. गाण्याचा रिमेक
गौतमी सध्या अनेक प्रोजेक्टवर काम करत आहे. तिने शेअर केलेल्या व्हिडिओतून गच्चीवरून कशी दिसते या गाण्याच्या रिमेक मधून ती प्रेक्षकांच्या समोर येणार आहे. 2017 मध्ये आलेलं गच्चीवरून कशी दिसते या गाण्याचा रिमेकमधून गौतमी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.या गाण्याचा व्हिडिओच गौतमीने शेअर केला आहे. मात्र, ओंकारला गौतमीसोबत पाहून चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसलाय. '
View this post on Instagram
या व्हिडिओच्या खाली नेहमीप्रमाणे चाहत्यांनी भन्नाट कमेंट्स केल्या आहेत. या कमेंट्सवर गौतमीनं 'शुटिंग आहे' अशी कमेंट केलीये. या गाण्याला चाहत्यांचा भरघोस प्रतिसाद मिळतोय. ओंकारचे चाहतेही त्याला नव्या कलाकृतीमध्ये पाहून खूपच खुश झाले आहेत.
ओंकार राऊतच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास ओमकार सध्या 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमातून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या कार्यक्रमातून त्याला प्रचंड लोकप्रियता मिळाली. त्याचबरोबर ओंकारने 'फुलपाखरू', 'फ्रेशर्स', 'टाईमपास', 'टाईमपास ३', 'चिकी चिकी बुबुम बूम', 'काळे धंदे', 'इन्स्पेक्टर झेंडे' यांसारख्या मालिका, सिनेमा आणि वेब सीरिजमध्ये काम केलं आहे.
























