Gautami Patil Dance Video : अभिनेत्री गौतमी पाटील (Gautami Patil Dance Video) हिला डान्स प्रोजेक्ट शिवाय सिनेक्षेत्रात सुद्धा मोठ्या ऑफर मिळत आहेत. सुरुवातीच्या काळात स्टेज डान्सर म्हणून काम करणारी गौतमी पाटील (Gautami Patil Dance Video) आता झी मराठीवरील मालिकांमध्ये देखील झळकू लागली आहे. तिने वेगवेगळ्या गाण्यांमध्ये देखील डान्सर म्हणून महत्त्वाची भूमिका साकारली आहे. आता गौतमी पाटील हिने सुंदरा गाण्यावर डान्स केलाय. हा व्हिडीओ तिने तिच्या इन्स्टाग्रामवरील अधिकृत अकाऊंटवरुन शेअर केलाय. गौतमीच्या (Gautami Patil Dance Video) या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी लाईक आणि कमेंट्सचा पाऊस पाडलाय.
नृत्यांगणा गौतमी पाटील या डान्स व्हिडीओमध्ये निक शिंदे या कलाकारासोबत डान्स करताना पाहायला मिळत आहे. यापूर्वी तिने आण्णा नाईक यांच्याबरोबर देखील अशाच प्रकारे डान्स केला होता. आता गौतमीचा सुंदरा या गाण्यावरील डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालाय.
गौतमी पाटीलचा एक नृत्यांगना म्हणून तिचा उदय अत्यंत संघर्षातून झाला असून, तिने आपल्या मेहनतीच्या जोरावर स्वतःचं स्वतंत्र स्थान निर्माण केलं आहे. मराठी लोकनाट्य आणि तमाशाच्या परंपरेतून आलेली ही मुलगी आज सोशल मीडियाच्या जगात ‘डान्सिंग क्वीन’ म्हणून ओळखली जाते. गौतमी पाटीलचा जन्म धुळे जिल्ह्यातील एक गावात झाला. लहानपणापासूनच तिच्या आयुष्यात संघर्ष होता. तिचे डान्स विडिओज सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल होऊ लागले आणि लोकांच्या मनात ती लोकप्रिय झाली.
गौतमी पाटीलच्या डान्समुळे अनेक वाद झाले, काही वेळा तिच्या कार्यक्रमांवर बंदीही आली, पण या सर्वांवर मात करून तिने आपलं नृत्य सुरू ठेवलं. काहींनी तिच्यावर टीका केली, तर अनेकांनी तिचं समर्थनही केलं. स्वतःच्या मर्यादा ओळखून आणि त्या सांभाळत लोकांना आनंद देणं हेच तिचं प्रमुख उद्दिष्ट आहे, असं ती अनेकदा मुलाखतीत सांगते.
दरम्यान, गौतमी पाटील सध्या टीव्ही मालिकांमध्ये आणि सिनेमांमध्ये देखील झळकू लागली आहे. तिची लोकप्रियता पाहून अनेक टिव्ही चॅनेल तिला आपल्या कार्यक्रमांमध्ये भूमिका निभावण्याची ऑफर देत आहेत. गौतमीनेही या भूमिका अतिशय उत्तमपणे पार पाडल्या आहेत. त्यामुळे गौतमी पाटीलच्या लोकप्रियतेत आणखी भर पडली आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या