Gautami patil dance video : मुंबईतील मागाठाणे येथे दहिहंडी उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला. (Gautami patil dance video) या उत्सवाचा खास आकर्षण ठरलीये लोकप्रिय नृत्यांगणा गौतमी पाटील. पारंपरिक दहिहंडीच्या उत्साहाला आधुनिक रंग देत गौतमी पाटीलने आपल्या खास डान्सने प्रेक्षकांची मने जिंकली. गौतमी पाटीलने या वेळी काळी साडी नेसून रंगमंच गाजवला. (Gautami patil dance video )  यावेळी तिच्या डोळ्यांवर स्टायलिश गॉगल देखील पाहायला मिळाला. (Gautami patil dance video) प्रत्येक ठेक्यावर तिच्या अदा आणि तालावर हजारो प्रेक्षकांनी टाळ्यांचा कडकडाट करत प्रतिसाद दिला. मागाठाणे येथील हा उत्सव आमदार प्रकाश सुर्वे यांच्याकडून आयोजित करण्यात आला होता. 

दहिहंडी फोडण्यासाठी जमलेल्या गोविंदा पथकांइतकीच रंगत गौतमीच्या नृत्यामुळे या उत्सवाला आली. तिच्या उपस्थितीमुळे संपूर्ण उसळलेल्या जल्लोषाचे वातावरण पाहण्यासारखे होते. छोट्या मुलांपासून तरुणाईपर्यंत सर्वच वयोगटातील प्रेक्षकांनी तिच्या परफॉर्मन्सचा मनसोक्त आनंद लुटला. गौतमी पाटीलने सादर केलेल्या तुफानी नृत्यामुळे मागाठाण्याचा दहिहंडी उत्सव अधिक अविस्मरणीय ठरला. प्रेक्षकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादाने तिच्या लोकप्रियतेची पुन्हा एकदा प्रचिती आली. आगामी काळातही ती विविध सांस्कृतिक सोहळ्यांमध्ये आपल्या कलाकारीने चाहत्यांचे मनोरंजन करत राहणार आहे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

VIDEO : 'मी साताऱ्याची गुलछडी..' गौतमी पाटीलचा दहिहंडी उत्सवात तुफान डान्स, स्टेज दणाणून सोडला

Sholay सिनेमातून सचिन पिळगावकरांचा गब्बरसोबतचा 'तो' सीन हटवला होता, 50 वर्षांनी कारण समोर!