Gautami Patil Dance On Akshaye Khanna Song: सध्या अक्षय खन्नाचा (Akshaye Khanna) 'धुरंधर' सिनेमा (Dhurandhar Movie) तुफान गाजतोय. तसा या सिनेमात मुख्य भूमिकेत अक्षय खन्ना झळकला आहे, पण प्रेक्षकांकडून कौतुकाचा वर्षाव होतोय तो अक्षय खन्नावर. त्याच्या अभिनयासोबतच त्यानं या सिनेमात केलेल्या डान्सचंही कौतुक होतंय. तसेच, अक्षय खन्ना ज्या Fa9la गाण्यावर थिरकला आहे, ते गाणंही सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालतंय. अक्षय खन्नाच्या डान्स स्टेप्स (Akshaye Khanna Dance Steps On Fa9la Song) आणि Fa9la गाणं याची भूरळ नेटकऱ्यांना पडलीच आहे, पण कलाकारही Fa9la गाण्यावर अक्षय खन्नानं केलेल्या हुक स्टेपचे फॅन्स झाले आहेत. यात गौतमी पाटीलही (Gautami Patil) आहे बरं का... आपल्या डान्स स्टाईलनं भल्याभल्यांना भूरळ घालणारी सबसे कातिल गौतमी पाटीलही अक्षय खन्नाच्या हुक स्टेपवर थिरकली आहे. सध्या तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.  

'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नानं साकारलेली 'रहमान डकैत'ची भूमिका आणि त्याची गाण्यातील एन्ट्री सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर Fa9la गाण्याचा ट्रेंड आला आहे. तर, हा ट्रेंज सगळेच फॉलो करत आहेत. कलाकार मंडळीसुद्धा अक्षय खन्नाच्या या व्हायरल गाण्यावर अनेक व्हिडीओ शेअर करत आहेत. यात गौतमी पाटीलही मागे नाही. तिलाही Fa9la गाण्यावर व्हिडीओ करण्याचा मोह आवरता आला नाही आणि तिनंही Fa9la गाण्यावर अक्षय खन्नाची हुक स्टेप केली आहे. 

राज्यभरातील तरुणांच्या गळ्यातील ताईत असलेली गौतमी पाटील या ना त्या कारणानं नेहमीच चर्चेत असते. सध्या गौतमी अक्षय खन्नाच्या Fa9la गाण्यावरील डान्समुळे चर्चेत आहे. गौतमीनं Fa9la गाण्याची हुक स्टेप करत एक व्हिडीओ रेकॉर्ड केला आहे. मोकळे केस आणि काळा गॉगल असा लुक करत गौतमीनं रस्त्याच्या शेजारी Fa9la गाण्यावरचा व्हिडीओ शेअर केला आहे. गौतमीचा हा Fa9la गाण्यावरील व्हिडीओ चाहत्यांनासुद्धा चांगलाच आवडला आहे.

गौतमीचा डान्स पाहून चाहत्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया 

गौतमीचा डान्स पाहून तिचे चाहते फारच खूश झाले आहेत. त्यांनी गौतमीच्या व्हिडीओवर लाईक आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. एका युजरनं 'मस्त हा मस्त' असं म्हणत गौतमीचं कौतुक केलं आहे. तर, 'सबसे कातील गौतमी पाटील' असं म्हणत तिच्यावर स्तुतिसुमनं उधळली आहेत. तर काहींनी 'खूप छान...','परफेक्ट...', असं म्हणत कमेंट्स केल्या आहेत. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Gautami Patil in Bigg Boss Marathi 6: 'बिग बॉस मराठी 6'च्या घरात गौतमी पाटील दिसणार? आधी हसली आणि मग म्हणाली...