Gautami Patil and Jahnavi Killekar Dance Video : मराठी मनोरंजन विश्वात सध्या एक भन्नाट व्हिडीओ चर्चेत आहे. लावणी क्वीन गौतमी पाटील आणि टेलिव्हिजनवरील लोकप्रिय अभिनेत्री जान्हवी किल्लेकर झगमगत्या मंचावर एकत्र थिरकताना दिसल्या आहेत  या दोघींनी मिळून 'सरकार तुम्ही केलंय मार्केट जाम' या भन्नाट गाण्यावर एक साथ डान्स सादर केला असून, तो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

गौतमी अन् जान्हवीच्या व्हिडीओवर लाईक आणि कमेंट्सचा पाऊस 

या व्हिडीओमध्ये दोघींची एनर्जी, स्टाइल आणि तालबद्ध लयबद्धता प्रेक्षकांच्या मनाला भुरळ घालणारी आहे. पारंपरिक लावणी स्टेप्ससोबत दोघींनी दिलेली आधुनिक टचने गाण्याला एक वेगळीच ऊर्जा दिली आहे. हा व्हिडीओ काही तासांतच हजारो लाइक्स आणि शेअर्स मिळवत ट्रेंडिंगमध्ये झळकला आहे. फॅन्स दोघींच्या केमिस्ट्रीचं प्रचंड कौतुक करत असून, "जान्हवी आणि गौतमी – दोघी मिळाल्या की मार्केट खरंच जाम!" अशा कमेंट्स पाहायला मिळत आहेत.

जान्हवीने अभिनय क्षेत्रात पदार्पण 2015 मध्ये "भाग्य दिले तू मला" या मराठी मालिकेतून केलं. त्यानंतर त्यांनी "सोनिया" या नकारात्मक भूमिकेतून विशेष ओळख मिळवली. विविध मराठी म्युझिक व्हिडिओंमध्ये (जसे "दर्याची मासोळी", "कोळीवाडा झिंगला", "गोल्डीची हळद") त्यांनी नृत्य आणि अभिनय सादर केला. "बिग बॉस मराठी – सीझन 5" मध्ये सहभाग घेतल्यानंतर खऱ्या अर्थाने तिची लोकप्रियता वाढली. तिथे जान्हवी स्पष्टवक्तेपणा आणि ठाम भूमिकेमुळे त्या चर्चेचा विषय ठरल्या.

गौतमी पाटीलने आपल्या मेहनतीने आणि नृत्यकौशल्याने मराठी मनोरंजन क्षेत्रात आपले स्थान निर्माण केले आहे. तिच्या नृत्याच्या कार्यक्रमांना मोठ्या प्रमाणावर प्रेक्षकांची उपस्थिती असते, आणि ती सोशल मीडियावरही सक्रिय आहे. तिच्या नृत्यशैलीत पारंपरिक लावणीला आधुनिकतेची जोड दिसून येते, ज्यामुळे ती तरुणांमध्ये विशेष लोकप्रिय आहे. गौतमीने आपल्या संघर्षमय प्रवासातून यश मिळवले असून, ती अनेक तरुणांसाठी प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व ठरली आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Bollywood Secrets : रंगेहाथ सापडले हे 9 सेलिब्रेटी अन् एका मिनिटात ‘इमेज’चा पार कचरा झाला! सन्मान गळून पडला, कारकीर्द सुद्धा उद्ध्वस्त