Marathi Actress Gargi Phule Post: मराठी मनोरंजनसृष्टीत गेल्या काही दिवसांपूर्वी मानधन बुडवल्याचा मुद्दा चांगलाच गाजला. अभिनेता शशांक केतकर न थेट निर्मात्याचे नाव घेत तीन-चार वर्ष लोटली तरी मालिकेचे मानधन न दिल्याचं व्हिडिओत सांगत खळबळ उडवून दिलेली. नंतर अनेकांनी त्यांच्यासोबत घडलेले अशाच आशयाचे प्रसंगही शेअर केले होते . दरम्यान, गेल्या काही वर्षांपासून मराठी मनोरंजनसृष्टीत सक्रिय असणाऱ्या अनेक मालिकांमधून महत्त्वाच्या भूमिका सांगणाऱ्या अभिनेत्री गार्गी फुले यांनी आता पैसे बुडवणाऱ्यांवर सोशल मीडियावर एक पोस्ट केलीय. या पोस्टमध्ये त्या चांगल्यात संतापल्याच दिसतंय. या पोस्टची सध्या एकच चर्चा आहे. आत्ता नुसती पोस्ट टाकतेय. यापुढे नावासकट लिस्ट टाकेन. असं म्हणत त्यांनी ही पोस्ट शेअर केली आहे.
नेमकं काय म्हणाल्या गार्गी फुले ?
पैसे बुडवणाऱ्या निर्मात्यांवर अभिनेत्री गार्गी फुले या फेसबुक पोस्टमध्ये चांगलं संतापल्याचे दिसून आलं. त्या म्हणाल्या " जगाला उपदेश देत जे फिरत असतात की धंदा कसा करावा, फिल्ममध्ये कसं पैसा आहे, कसा पैसा नाही ....आणि काय केलं की फिल्म चालू शकेल विशेषतः मराठी ...त्यांनी आधी केलेल्या कामांचे पैसे द्यावेत लोकांना. काम करणारी लोक भिकारी नाहीत. मेहनत करतात आणि त्याचा मोबदला असतो जो आधीच ठरलेला असतो. ही आत्ता नुसती पोस्ट टाकत आहे. यापुढे नावासकट लिस्ट टाकेन. ता .क . माझे कुठलेही पैसे बुडाले नाहीत. पण माझ्या प्रिय सदांचे अजून दिले नाहीत.तेव्हा कृपया मला फोन करून विचारू नये काय झालं म्हणून . " असं त्या म्हणाल्या आहेत.
अभिनेत्री गार्गी फुले कोण ?
अभिनेत्री गार्गी फुले ह्या गेल्या अनेक वर्षांपासून मराठी मनोरंजन सृष्टीत कार्यरत आहेत. राजा राणीची गं जोडी, तुला पाहते रे, इंद्रायणी, सुंदरा मनामध्ये भरली, अशा काही मालिकांमध्ये महत्त्वाच्या भूमिकेत त्या दिसल्या. अभिनेत्री गार्गी फुले या दिवंगत अभिनेते निळू फुले यांची मुलगी आहे. मालिकांसह अनेक मराठी सिनेमांमध्येही त्या दिसल्या. ' मसाला ' हवाहवाई, नवरदेव बीएससी ऍग्री, कढीपत्ता,चिकट गुंडे या सिनेमांमध्येही त्यांनी प्रेक्षकांचे मनोरंजन केले.शिवाय काही नाटकांमधूनही त्या दिसत असतात.
