Gadar Fame Actress Life Story: बॉलिवूडची अशी अभिनेत्री, जिच्या फोटोसोबत लग्न करायचे फॅन्स; वयाच्या पन्नाशीत जगतेय एकटीनं आयुष्य, ओळखलं का कोण?
Gadar Fame Actress Life Story: आम्ही ज्या अभिनेत्रीबाबत बोलत आहोत, ती म्हणजे, 2000 साली 'कहो ना प्यार है' चित्रपटातून पदार्पण करणारी अभिनेत्री अमिषा पटेल.

Gadar Fame Actress Life Story: बॉलिवूडमध्ये (Bollywood News) अशा अनेक अभिनेत्री (Actress) आहेत, ज्या त्यांच्या आयुष्याचा अर्ध्याहून अधिक काळ जगल्या आहेत, पण अजूनही त्या बोहोल्यावर चढलेल्या नाहीत. अशीच एक बॉलिवूडची अभिनेत्री (Bollywood Actress) आहे, जिनं वयाची पन्नाशी ओलांडली आहे. पण तिचं आकर्षण आणि सौंदर्य कमी झालेलं नाही. रुपेरी पडद्यावर या अभिनेत्रीनं सोनिया साकारली आणि लोकांनी मनं जिंकली. तर, कधी तिनं सकीना साकारली आणि प्रसिद्ध झाली. त्या काळात या अभिनेत्रीनं चाहत्यांवर इतकी भूरळ घातलेली की, अनेक चाहते तिच्या फोटोसोबतही लग्न करायला लागलेले. पण, असं असूनही वयाची पन्नाशी गाठूनही या अभिनेत्रीनं मात्र, अद्याप कुणाशीच लग्न केलेलं नाही. तुम्ही ओळखता का? बॉलिवूडच्या फेमस अभिनेत्रीला?
पहिलाच सिनेमा झालेला ब्लॉकबस्टर
आम्ही ज्या अभिनेत्रीबाबत बोलत आहोत, ती म्हणजे, 2000 साली 'कहो ना प्यार है' चित्रपटातून पदार्पण करणारी अभिनेत्री अमिषा पटेल. या अभिनेत्रीचा पहिला चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला. त्यानंतर तिनं 'गदर' सिनेमाची सकीना बनून बॉलिवूड आणि चाहत्यांची मनं जिंकली. या अभिनेत्रीनं तिच्या कारकिर्दीत सलमान खान आणि सनी देओलसह अनेक मोठ्या स्टार्ससोबत काम केलं. पण आता ती क्वचितच चित्रपटांमध्ये दिसली. ती शेवटची 'गदर 2' मध्ये दिसली होती.
View this post on Instagram
अमीषा पटेलनं लग्न का नाही केलं?
अमिषा पटेलनं वयाची पन्नाशी गाठली आहे. पण तिनं अजून लग्न केलेलं नाही. मात्र, तिच्या बॉलिवूडच्या कारकिर्दीत तिचं नाव अनेक अभिनेत्यांशी जोडलं गेलेलं. पण कोणासोबतच तिचं नातं लग्नापर्यंत पोहोचलं नाही. तसेच, अभिनेत्रीनं एकदा बोलताना लग्न न करण्याबाबत स्पष्टच सांगून टाकलेलं.अमिषा पटेल म्हणालेली की, "मी माझ्या आयुष्यात खूप आनंदी आहे. मला कुणाच्याही सहवासाची कमतरता अजिबात जाणवत नाही. मी माझ्या कामात इतकी व्यस्त आहे की, माझ्याकडे या सगळ्यासाठी अजिबात वेळ नाही..."
फॅन फॉलोविंग इतकी की, चाहते फोटोशीच करू लागलेले लग्न
अमिषा पटेलनं 'हिंदुस्तान टाईम्स'ला दिलेल्या मुलाखतीत इंडस्ट्रीतल्या तिच्या आजवरच्या प्रवासाबद्दल मनमोकळेपणानं सांगितलं. ती म्हणाली की, ती लाखो हृदयांची धडधड बनली आहे. असे अनेक चाहते आहे, जे माझे फोटो मंदिरं आणि चर्चेमध्ये घेऊन जाऊन त्याच्याशी लग्न करायचे. काही जण मला पत्रं पाठवायचे. ज्यामध्ये हार घालून आणि भांगात कुंकू भरलेले फोटोही होते.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
























