Friday New Release: एप्रिल महिन्याचा तिसरा शुक्रवार प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची खास मेजवानी घेऊन आला आहे .एकीकडे बॉक्स ऑफिसवर धुरंधर 2 ने कमाईचे नवे रेकॉर्ड मोडले आहेत . धुरंधर ला टक्कर देण्यासाठी अक्षय कुमारचा हॉरर कॉमेडी आता प्रदर्शनाच्या तयारीत आहे. चित्रपटगृहांसह आठवड्यात ओटीटीवरही उत्कृष्ट चित्रपट आणि वेब सिरीजचं वादळ येणार आहे. चित्रपटगृहांपासून ते ओटीटी प्लॅटफॉर्मपर्यंत या शुक्रवारी ( 17 एप्रिल ) प्रेक्षकांसाठी कोणते खास चित्रपट प्रदर्शित होत आहेत ? चला जाणून घेऊया. (OTT relese this Week)
अस्सी (Assi)
तापसी पन्नूचा कोर्टरूम ड्रामा 'अस्सी' चित्रपटगृहांमध्ये फारसा यशस्वी ठरला नसला तरी, आता तो ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होण्यास सज्ज आहे. या चित्रपटाद्वारे दिग्दर्शक अनुभव सिन्हा आणि तापसी पन्नू हॅट-ट्रिक साधण्याचा प्रयत्न करत आहेत. ही कथा एका शालेय शिक्षिकेभोवती फिरते. तिच्यावर तिच्याच कॉलेजमधील विद्यार्थ्यांकडून बलात्कार होतो. यानंतर, ती त्यांच्याविरुद्ध कायदेशीर लढाई लढण्याचा निर्णय घेते. वकील रवी म्हणजेच तापसी पन्नू तिची केस लढवते, पण या प्रवासात तिला अनेक गंभीर आव्हानांना सामोरे जावे लागते.
रिलीज डेट:17 एप्रिलप्लॅटफॉर्म:ZEE5जॉनर:कोर्टरूम ड्रामा
भूत बंगला (Bhooth Bangla)
अक्षय कुमार आणि दिग्दर्शक प्रियदर्शन यांची ब्लॉकबस्टर जोडी 16 वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर परत येत आहे. 'हेरा फेरी', 'भागम भाग' आणि 'गरम मसाला' यांसारखे अनेक यशस्वी विनोदी चित्रपट दिल्यानंतर, ही जोडी आता 'भूत बंगला' या चित्रपटाद्वारे चित्रपटगृहांमध्ये परत येत आहे. या चित्रपटाचा 16 एप्रिल रोजी पेड प्रिव्ह्यू झाला होता आणि तो शुक्रवारी प्रेक्षकांसाठी प्रदर्शित होईल. या चित्रपटात अक्षय कुमारसोबत परेश रावल, तब्बू आणि राजपाल यादव यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
पेड प्रीव्यू:16 एप्रिलरिलीज डेट: 17 एप्रिलप्लॅटफॉर्म: चित्रपटगृहजॉनर:हॉरर कॉमेडी
रूममेट्स (Roommates)
दर आठवड्याला नेटफ्लिक्स तरुण पिढीला आवडेल असे काहीतरी नवीन घेऊन येतं.या आठवड्यात 'रूममेट्स' नावाची एक 'कमिंग-ऑफ-एज' कॉमेडी-ड्रामा मालिका येत आहे. ही मालिका तरुण महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या जीवनातील गुंतागुंत उलगडते. ही कथा डेव्हन नावाच्या एका साध्याभोळ्या विद्यार्थिनीभोवती फिरते. तिची कॉलेजमध्ये आल्यावर तिच्या रूममेटसोबत घट्ट मैत्री होते. मात्र, लवकरच या मैत्रीचे रूपांतर एका भांडणात होते.
रिलीज डेट: 17 एप्रिलप्लॅटफॉर्म: Netflixजॉनर: कॉमेडी ड्रामा
अल्फा मेल्स सीजन 5 (Alpha Males Season 5)
नेटफ्लिक्स आपली लोकप्रिय विनोदी मालिका 'अल्फा मेल्स'चा पाचवा सीझन घेऊन परत येत आहे. पाचव्या सीझनमध्ये पेड्रो, लुईस, राऊल आणि सांती हे घटस्फोट आणि मुलांच्या ताब्यासाठीच्या कायदेशीर लढाईतील आव्हानांना तोंड देताना दिसतात. यात नातेसंबंध, घटस्फोट आणि आयुष्यातील संघर्ष विनोदी पद्धतीने दाखवले आहेत.
रिलीज डेट: 17 एप्रिलप्लॅटफॉर्म: Netflixजॉनर: कॉमेडी
मटका किंग (Matka King)
चाहते विजय वर्माच्या 'मटका किंग' या क्राईम ड्रामा मालिकेची आतुरतेने वाट पाहत आहेत. नागराज मंजुळे दिग्दर्शित या मालिकेत विजय वर्माने 'बृज भाटी' या महत्त्वाकांक्षी कापूस व्यापाऱ्याची भूमिका साकारली आहे. तो 'मटका' नावाची स्वतःची एक सट्टेबाजीची पद्धत सुरू करतो, जी श्रीमंत आणि सामान्य माणसाला जोडते. मात्र, ब्रज गुन्हेगारीच्या अंधाऱ्या दुनियेत अडकतो.
रिलीज डेट: 17 एप्रिलप्लॅटफॉर्म: Amazon Prime Videoजॉनर: क्राइम ड्रामा
उस्ताद भगत सिंह (Ustaad Bhagat Singh)
पवन कल्याण आणि श्रीलीला अभिनीत 'उस्ताद भगत सिंग', ज्याने दाक्षिणात्य बॉक्स ऑफिसवर रणवीर सिंगच्या 'धुरंधर 2' ला कडवी टक्कर दिली होती, तो आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे. ज्यांनी हा चित्रपट थिएटरमध्ये पाहिला नाही, ते आता तो घरी बसून पाहू शकतात. हा चित्रपट ओटीटीवर हिंदी, तेलुगू, तमिळ, कन्नड आणि मल्याळम भाषांमध्ये उपलब्ध आहे.
रिलीज डेट: 16 एप्रिलप्लॅटफॉर्म: Netflixजॉनर: अॅक्शन ड्रामा
द ममी (The Mummy)
'ईविल डेड राइज'चे दिग्दर्शक ली क्रोनिन यांनी 'द ममी' या हॉरर फ्रँचायझीला नव्या रूपात सादर केले आहे. या चित्रपटाचा 2017 च्या टॉम क्रूझच्या चित्रपटाशी काहीही संबंध नाही. या चित्रपटात जॅक रेनर, लाया कोस्टा आणि व्हेरोनिका फाल्कॉन यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा हॉरर चित्रपट भारतात 17 एप्रिल रोजी प्रदर्शित होत आहे. तो इंग्रजी, हिंदी, तमिळ आणि तेलुगू भाषांमध्ये प्रदर्शित होईल.
रिलीज डेट: 17 एप्रिलप्लॅटफॉर्म: थिएटर्सजॉनर: हॉरर
