मुंबई : बॉलिवूडमधील प्लेबॅक सिंगर भूमि त्रिवेदी मुंबई क्राईम ब्रँचमध्ये तक्रार नोंदवली होती. त्याच्यानंतर इंटरनॅशनल रॅकेटचा एका सदस्य अभिषेक दौडे  याला अटक करण्यात आली आहे. अटक केलेला आरोपी एका अशा इंटरनॅशनल रॅकेटचा सदस्य आहे, जो एका सॉफ्टवेअर प्रोग्रामच्या माध्यमाने बड्या लोकांचे बनावट प्रोफाईल बनवून त्यांच्याबाबत चुकीचे आक़डे, परफॉर्मन्स आणि खोट्या कमेंटच्या माध्यमाने लोकांची दिशाभूल करायचा.  खोटे प्रोफाईल बनवून त्यावर लाखो लाईक, व्हिव्ज आणि रिव्ह्यू कमेंट तयार करायचा, ज्यामुळे लोकांची दिशाभूल व्हायची.


क्राईम ब्रांचच्या सेंट्रल इंटेलिजन्स युनिटने जेव्हा याचा तपास सुरू केला तेव्हा कळलं की, फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर अशा वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरून खोटे प्रोफाईल बनवून लोकांपर्यंत चुकीची माहिती पोहोचवली जात होती. ज्यावर लाखो लाईक आणि कमेंट येत होत्या. तर काही खोट्या पोस्ट सुद्धा करण्यात आल्या होत्या. त्याच्यामुळे समाजामध्ये भीतीचं आणि तणावाचं वातावरण निर्माण होत होतं. याच्या व्यतिरिक्त अशाच प्रकारे खोट्या प्रोफाईलच्या माध्यमाने कित्येक बॉलिवूड सेलिब्रिटींना संपर्क करण्यात आला होता. ज्यामुळं सेलिब्रिटींच्या कमेंटनंतर अशा खोट्या बातम्या अधिक जलद गतीने पसरवण्यास मदत झाली असती.

जास्त लाईक आणि कमेंट बघून लोकांची दिशाभूल करणे सोपं होतं. तसेच लोकांची दिशाभूल करणारी सोप्पं होतं.  क्राईम बँचच्या माहितीनुसार अटक करण्यात आलेल्या आरोपी अभिषेक दौडे याने 176 खोटे प्रोफाईल बनवले होते. ज्याचे कोटींच्या घरात फॉलोवर्स होते.

मिळालेल्या माहितीनुसार आरोपी अभिषेक दौडे हा समाजामध्ये तणाव आणि भीती निर्माण करण्यासाठी या टेक्नॉलॉजीचा वापर करत होता. त्याच्यासोबत अजून त्याचे कोण साथीदार आहेत आणि अजून कुठल्या देशांमध्ये याचे जाळे पसरलेले आहे, याचा तपास आता क्राईम ब्रँच करत आहे.