Sanjay Bangar Son Aryan Bangar Become Anaya Bangar: संजय बांगर (Sanjay Bangar) यांना कोण ओळखत नाही. प्रसिद्ध क्रिकेटपटू अशी त्यांची ओळख. याशिवाय इतरही अनेक बाबतीत संजय बांगर यांनी क्रिडाविश्वात महत्त्वाचं योगदान दिलं आहे. भारतीय माजी क्रिकेटपटू आणि समलोचक संजय बांगर सध्या IPL मध्ये व्यस्त आहे. पण, सध्या आणखी एका गोष्टीमुळे चर्चेत आले आहेत. ते म्हणजे, त्यांचा मुलगा. काही महिन्यांपूर्वी क्रिकेटपटू संजय बांगर यांचा मुलगा परदेशात गेला होता, जिथे त्यानं त्यांची लिंगबदल शस्त्रक्रिया केली. शस्त्रक्रियेनंतर संजय बांगर यांचा मुलगा आर्यन (Aryan Bangar), मुलगी झाला आणि अनया (Anaya Bangar) अशी आपली नवी ओळख घेऊन जगासमोर आला. आता आर्यन बांगर, अनया बांगर नावानं ओळखली जाते.
लिंग बदलाची शस्त्रक्रिया केल्यानंतर अनया बांगर नुकतीच भारतात परतली. मुंबईत आल्यानंतर तिनं आपली हेअरस्टाईल आणि लूक देखील बदलला. शस्त्रक्रियेनंतर मुलगी झालेल्या अनयाचे सोशल मीडियावर अनेक फॉलोअर्स आहेत. अनयाच्या प्रत्येक अपडेट्सवर चाहते भरभरुन लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत असतात. अनया खूपच ग्लॅमरस दिसते, असं तिचे चाहते सोशल मीडियावर म्हणत असतात. दरम्यान, अशातच आता तिच्या नव्या लूकपेक्षाही सोशल मीडियावर तिच्या भन्नाट डान्सची चर्चा रंगल्याचं पाहायला मिळत आहे.
अनायाचा डान्स पाहून सारेच अवाक्
अनायानं डान्सचा व्हिडिओ तिच्या इन्स्टाग्राम हँडलवरुन शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये, अनन्या क्लासी डान्स मूव्ह्स करताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये अनन्या काळ्या रंगाचा क्रॉप टॉप आणि पांढऱ्या रंगाची बॉटम घातलेली दिसते. ती तिच्या नृत्य शिक्षकासोबत सराव करताना दिसते. अशा परिस्थितीत लोक अनन्याच्या स्टाईल आणि लूकचे कौतुक करत आहेत. एका युजरनं लिहिलंय की, मुलगा मुलगी झाल्यानंतर त्याच्यात अनेक बदल होतात. अशा परिस्थितीत, इतके सुंदर एक्सप्रेशन्स देणं सोपं नाही. तर दुसऱ्या एका युजरनं लिहिलंय की, आता हेच पाहायचं बाकी होतं.
प्रसिद्ध माजी क्रिकेटपटू आणि समालोचक असलेल्या संजय बांगर या ना त्या कारणांमुळे चर्चेत असतात. पण, सध्या त्यांच्यापेक्षा जास्त त्यांचा मुलगा चर्चेत आहे. काही काळापूर्वी संजय बांगर यांचा मुलगा परदेशात गेला होता आणि त्यानं त्याची लिंगबदलाची शस्त्रक्रिया केली होती. त्यानंतर त्यानं त्याचं नाव आर्यन वरून अनया, असं बदललं. आर्यननं त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर त्याच्या प्रवासाची संपूर्ण माहिती शेअर केली आहे. या प्रवासात त्यांना कोणत्या अडचणींना तोंड द्यावं लागले हे त्यांनी स्पष्ट केलं आहे.
अनया भारतात परतल्यानंतर आनंदी
आर्यन बांगर, जो आता अनया बांगर झाला आहे, तो गेल्या बऱ्याच काळापासून परदेशात राहत होता. तो नुकताच भारतात आला आहे. अनयानं भारतात येताच तिनं तिच्या लूकमध्ये आणखी काही बदल केले आणि त्यानंतर तिनं बरीच खरेदी केली, ज्यामध्ये तिनं सलवार सूट खरेदी केला, ज्याचा व्हिडीओ तिनं तिच्या इंस्टाग्रामवर देखील शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करताना तिनं लिहिलंय की, ती भारतीय कपड्यांच्या प्रेमात पडली आहे.