former Australian cricketer David warner : ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरचे भारतावरचं प्रेम सर्वश्रूत आहे. वॉर्नरला भारतीय लोक येथील संस्कृती आणि भारतीय चित्रपट देखील तेवढेच आवडतात. दरम्यान, क्रिकेटच्या मैदानावर गोलंदाजांकडून षटकार ठोकणारा वॉर्नर आता आपल्या अभिनयाने चाहत्यांची मने जिंकण्यास सज्ज झालाय. अलीकडेच त्याने 'रॉबिनहूड' या तेलगू चित्रपटातून सिनेक्षेत्रात पदार्पण केले. तो रॉबिनहूड या दाक्षिणात्य सिनेमात काम करणार आहे. या सिनेमात त्याचा छोटासा रोल असणार आहे. या सिनेमात मुख्य भूमिका अभिनेता नितीन आणि अभिनेत्री श्रीलीला यांची आहे. 

क्रिकेटशिवाय वॉर्नरला जर कशाची आवड असेल तर ती म्हणजे अभिनय आहे. आता भारताने त्याची ही इच्छा देखील  पूर्ण केली आहे. साऊथ ॲक्टर नितीन आणि श्रीलीला यांचा 'रॉबिनहूड' चित्रपट 28 मार्च रोजी थिएटरमध्ये रिलीज झाला आहे. यात वॉर्नर कॅमिओ करताना दिसत आहे. पण विशेष बाब  म्हणजे छोट्याशा भूमिकेसाठी डेव्हिड वॉर्नरने मोठी रक्कम आकारली आहे. वॉर्नरने कॅमिओसाठी किती कोटी रुपये घेतले ते जाणून घेऊया.

डेव्हिड वॉर्नरने त्याच्या पहिल्या चित्रपटातून चांगली कमाई केली आहे. OTT Play च्या रिपोर्टनुसार, डेव्हिड वॉर्नरला या चित्रपटात छोट्या भूमिकेसाठी 3 कोटी रुपये भरावे लागले आहेत. आयपीएल 2024 च्या शेवटी वॉर्नरने 'रॉबिन हूड' शूट केल्याचेही सांगण्यात आले. दरम्यान, अभिनेत्री रश्मिका मंदाना हिने पुष्पा सिनेमासाठी 3 कोटी रुपये घेतले होते, तेवढीच रक्कम वॉर्नरने या सिनेमातील छोट्याशा रोलसाठी आकारली आहे. 

नितिन आणि श्रीलीला यांचा 'रॉबिनहूड' चित्रपट वेंकी कुदुमुला यांनी दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटाची कथाही त्यांनी लिहिली आहे. नितीन आणि श्रीलीला व्यतिरिक्त देवदत्त नागे, राजेंद्र प्रसाद आणि शाइन टॉम चाको देखील चित्रपटाचा भाग आहेत. निर्मात्यांनी 55 ते 70 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये हा चित्रपट तयार केला आहे. सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार, रिलीजच्या पहिल्या दिवशी या चित्रपटाने भारतात केवळ 2 कोटींची कमाई केली आहे.

माजी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला मोठा धक्का बसला जेव्हा त्याला आयपीएल 2025 च्या लिलावात कोणत्याही संघाने विकत घेतले नाही. T-20 लीगच्या इतिहासात वॉर्नर हा सर्वाधिक चर्चेत असलेला खेळाडू आहे. मात्र, यंदाच्या हंगामाच्या लिलावात त्याला एकही खरेदीदार मिळाला नाही. पण असे असतानाही त्याने भारतीय चित्रपटांमध्ये कॅमिओ करून करोडो रुपये कमावले आहेत.

 

इतर महत्वाच्या बातम्या 

कधीकाळी ऐश्वर्या रायसोबत काम अन् आता मुलग्याचा मुलगी झाला; लिंग बदलाची कहाणी ऐकून अंगावर काटा येण्याची वेळ

एकेकाळी युरोपच्या गल्ल्यांमध्ये रोमँटिक फोटोशूट, प्राजक्ता माळीसोबतचा 'तो' तरुण कोण?