पुणे : दिग्दर्शक रोहित शेट्टी (Firing at Rohit Shettys house) याच्या जुहूतील बिल्डिंगवर गोळीबार झाला. सुदैवाने या गोळीबारात कोणी जखमी नाही पण या गोळीबारामुळे भीतीचं वातावरण निर्माण झालं. या प्रकरणी पोलिसांना पाच संशयित आरोपींना पुण्यातून अटक केली आणि हे चार आरोपी बिश्नोई गॅंगचे असल्याचं समजतंय. रोहित शेट्टी याच्या घरावर झालेला गोळीबार (Firing at Rohit Shettys house) आणि अटक करण्यात आलेले आरोपी राज्याला पुन्हा एकदा बिश्नोई गॅंगची आठवण करुन देणारा आणि धोकादायक प्रसंग आहे.(Firing at Rohit Shettys house)

Continues below advertisement

रोहित शेट्टी... बॉलीवूडचा स्टंटचा बादशाह म्हटलं तरी हरकत नाही. याच रोहित शेट्टीच्या घरावर मध्यरात्री गोळीबार झाला. एक- दोन नाही तर थेट पाच राऊंड फायर केले. लॉरेन्स बिश्नोई गॅंगच्या पाच संशयितांना पुणे पोलिसांसांनी अटक केली. मात्र धक्कादायक हे आहे की या पाच पैकी एक संशयित सोडला तर बाकी कोणाचाही कोणत्याची गुन्ह्यांशी संबंध नाही आणि पार्श्वभूमी नाही. पाच जणांना अटक केली. त्याचं ना कोणती गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. ना ते कोणत्या टोळीशी संबंधित आहेत. मग ते या प्रकरणात कसे आले याचाही तपास सुरू आहे.(Firing at Rohit Shettys house)

1. अमन आनंद मारोठे - वय 27 - धंदा साफसफाई - कर्वेनगरला राहतो2. आदित्य ज्ञानेश्वर गायके - वय 19 - धंदा डिलिव्हरी बॉय - कर्वेनगरला राहतो3. सिद्धार्थ दीपक येनपुरे - वय 20 - धंदा काही करत नाही - धायरीत राहतो4. समर्थ शिवशरण पोमाजी - वय 18 - धंदा - शिक्षण घेतोय - धायरीत राहतो5. स्वप्नील सकट - वय -  23 -  धंदा - सध्या काय करत नाही - धायरी

Continues below advertisement

लॉरेन्स बिश्नोई गॅंगशी संबंधित असलेले हे संशयित आरोपी आहेत. मात्र ज्यांनी गोळीबार केला त्यांचा अजून शोध सुरु आहे.  लॉरेन्स बिश्नोई गॅंगमध्ये गुन्हेगारीची पार्श्वभूमी नसलेले तरुण आहेत. त्यांना गुन्हेगारीकडे ओढणं आणि त्यांना थेट सांगेल तिथे गोळीबार करायला लावणं हीच लॉरेन्स बिश्नोई गॅंग खासियत आहेत. 

 लॉरेन्स बिश्नोई गॅंग तरुणांना कसं गुन्हेगारीकडे आकर्षित करतो?

- इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर बिश्नोईचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करतात आणि गुन्हेगारीचं उदात्तीकरण करतात. यामुळे अनेक तरूणांना गुन्हेगारीमध्ये ग्लॅमर आणि प्रसिद्धी मिळते असे वाटतं. - ही गँग तरुणांना मोठ्या रकमेचे आमिष दाखवते. बाहेर देशात काम करण्याची स्वप्न दाखवते. - ही गँग जाणीवपूर्वक अशा तरुणांना निवडतात की ज्यांचा कोणताही जुना गुन्हेगारी रेकॉर्ड नाही, जेणेकरून पोलिसांच्या नजरेत न येता ते काम करू शकतील. 

लॉरेन्स बिश्नोई गॅंगने या पूर्वीदेखील थेट गोळीबार करत हत्या केल्या आहेत. प्रसिद्ध पंजाबी गायक 2022 मध्ये सिद्धू मूसेवालाची हत्या केली. एप्रिल 2024 मध्य वांद्रे येथील सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार करण्यात आला होता, ज्याची जबाबदारी अनमोल बिश्नोईने घेतली होती. ऑक्टोबर 2024 मध्ये मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांची वांद्रे येथे हत्या करण्यात आली.

गुन्हेगारीची पार्श्वभूमी नसलेल्या तरुणांना आपल्या जाळ्यात अडकवायचं आणि त्यांच्याकडून गुन्हा गोळीबार, खंडणीसारखे गुन्हे करुन घ्यायचे. मात्र लॉरेन्स बिश्नोई गॅंगच्या या गुन्हेगारीच्या तऱ्ह्यांमुळे पोलीस मात्र कायम चक्रावतात. गुन्हा घडला की सुरुवातीला पोलीस थेट टोळ्यांची माहिती काढतात आणि संशयितांना ताब्यात घेतात, मात्र लॉरेन्स बिश्नोई गॅंगच्या या गुन्हेगारीशी काहीही संबंध नसलेल्या तरुणांना ताब्यात घेणं पोलिसांसाठी मोठं आव्हान ठरत चाललंय. एकीकडे आंतरराष्ट्रीय गुन्हेगार म्हणून घोषित करण्यात आलाय.