FIR Against Shreyas Talpade: एकीकडे बॉलिवूड (Bollywood News) अभिनेता राजपाल यादव (Rajpal Yadav) चेक बाउन्स प्रकरणात (Cheque Bounce Case) अडचणीत सापडला आहे. काही दिवसांपूर्वीच अभिनेत्यानं तिहार तुरुंगात सरेंडर केलं आहे. तर, अशातच आता आणखी एका मराठमोळ्या बॉलिवूड अभिनेत्याच्या अडचणींत वाढ झाली आहे. मराठमोळा अभिनेता श्रेयस तळपदे (Actor Shreyas Talpade) विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशातच आता श्रेयस तळपदेच्या अडचणींत वाढ झाली असून बॉलिवूड पुरतं हादरलं आहे. 

Continues below advertisement

मैनपुरीतील भोगांवची इथे अभिनेता श्रेयस तळपदेसह 12 जणांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका व्यक्तीनं या सर्वांवर गुंतवणुकीच्या नावाखाली लाखो रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप केला आहे. 

एएनआयनं दिलेल्या माहितीनुसार, 10 फेब्रुवारी रोजी मैनपुरीच्या भोगांव पोलीस ठाण्यात चित्रपट अभिनेता श्रेयस तळपदेसह 12 जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. भोगांवच्या मोहल्ला मिश्राणा इथे राहणाऱ्या एका व्यक्तीनं सिनेस्टार आणि त्याच्या साथीदारांवर गुंतवणुकीच्या नावाखाली लाखो रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप केलाय.

Continues below advertisement

श्रेयस तळपदेसह 12 जणांविरुद्ध FIR

न्यायालयाच्या आदेशानंतर पोलिसांनी याप्रकरणाचा तपास सुरू केला. असा आरोप केला जातोय की, अभिनेत्यानं त्याच्या साथीदारांसह शहरातील मिश्राना परिसरातील मुंबई बँकेच्या शाखेत गुंतवणुकीच्या नावाखाली गावकऱ्यांची लाखो रुपयांची फसवणूक केली. एफआयआरमध्ये नाव असलेल्या 12 व्यक्तींमध्ये समीर अग्रवाल, सानिया अग्रवाल, आरके सेट्टी, फंड मॅनेजर संजय मुदगिल, शबाब हुसेन, श्रेयस तळपदे, नरेंद्र नेगी, पंकज अग्रवाल, सुप्रिया, अनुज जैन, अजय श्रीवास्तव आणि अरविंद त्रिपाठी यांचा समावेश आहे.

प्रकरण नेमकं काय?

एफआयआरच्या प्रतीनुसार, 14 जणांनी न्यायालयात तक्रार दाखल केली की, सागा ग्रुपचे संचालक समीर अग्रवाल आणि त्यांची पत्नी सानिया अग्रवाल यांनी 2015 मध्ये त्यांच्या परिसरात एलयूसीसी बँकेची शाखा उघडली. शेकडो लोकांनी त्यात गुंतवणूक केली. दरम्यान, जेव्हा लोकांनी त्यांचे पैसे परत मागितले, तेव्हा समीरनं ते परत करण्यास नकार दिला आणि उलट त्यांना खोट्या प्रकरणात अडकवण्याची धमकी दिली. तसेच, 2024 मध्ये बँक सामान पॅक करून निघून गेली.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Rajpal Yadav Receives 1.11 Crore: राजपाल यादवला 1.11 कोटींची मदत; अभिनेत्यासाठी देवदूत ठरलेला इंडस्ट्रीतला 'राव इंद्रजित सिंह' कोण?