Filmmaker Hemant Kumar Arrested: साऊथ सिनेसृष्टीतले (South Movie) प्रसिद्ध निर्माते हेमंत कुमार (Hemant Kumar) यांच्याविरोधात सुप्रसिद्ध अभिनेत्रीनं (Famous Actress) लैंगिक छळाची तक्रार केली आहे. अभिनेत्रीच्या तक्रारीनंतर बंगळुरू पोलिसांना (Banglore Police) तात्काळ निर्मात्याला अटक केली आहे. निर्माता हेमंतनं 2022 मध्ये अभिनेत्रीशी संपर्क साधलेला आणि त्याचा आगामी सिनेमा 'रिची'मध्ये काम देण्याचं आश्वासन दिलेलं. 

Continues below advertisement


मिडिया रिपोर्टनुसार, हेमंत कुमार आणि अभिनेत्रीमध्ये 2 लाख रुपयांचा करार झालेला, ज्यामध्ये 60,000 हजार रुपये अभिनेत्रीला आगाऊ देण्यात आलेले. पण, त्यानंतर सिनेमाचं शुटिंग आणि त्यानंतर रिलीज होण्यासाठी उशीर होत असल्यामुळे ती पुरती निराश झाली. याचदरम्यान निर्मात्यानं अभिनेत्रीकडे नको त्या गोष्टींचं फेवर मागितलं. 


फिल्ममेकरवर अभिनेत्रीकडून गंभीर आरोप (Actress Makes Serious Allegations Against Filmmaker)


अभिनेत्रीनं आरोप लावत पोलिसांना सांगितलं की, हेमंत यांनी त्यांना फिल्मच्या काही सीन्ससाठी तिला अत्यंत अश्लील कपडे वेअर करायला सांगितलं. याव्यतिरिक्त त्यानं सांगितलं की, काही अश्लील सीन करण्यासाठी तिच्यावर प्रेशर टाकलं गेलं. तसेच हेमंतनं तिला चुकीच्या पद्धतीनं स्पर्श करण्याचाही प्रयत्न केला. हेसर्व तिच्यासाठी अत्यंत त्रासदायक होतं. तक्रारीमध्ये अभिनेत्रीने पुढे म्हटलंय की, निर्माता हेमंतने अभिनेत्रीशी अश्लील वर्तन केले आणि मुंबईच्या दौऱ्यादरम्यान तिला त्रासही दिला होता. तिने हेमंतच्या मागण्या नाकारल्यानंतर त्याने तिला गुंडांकडून धमकावल्याचंही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.


पमेंटचा चेक बाउन्स झाला...


निर्मात्यानं अभिनेत्रीला शूटिंग पूर्ण झाल्यानंतर एक चेक दिला. पण हा चेक बाऊन्स झाल्याचं देखील अभिनेत्रीनं सांगितलं. इतकंच नव्हे तर, अभिनेत्रीच्या समंतीशिवाय चित्रपटात अश्लील सीन शूट करण्यास भाग पाडलं. तसेच हे सीन्स सोशल मीडियावर पोस्ट करण्यास जबरदस्ती देखील केली. अभिनेत्रीच्या या तक्रारी आणि आरोपांनंतर राजाजीनगर पोलिसांनी हेमंतला अटक करून न्यायालयीन कोठडीत पाठवलं. सध्या या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.                                                                                                                   


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Yuzvendra Chahal On Dhanashree Verma: 'तिचं घर माझ्यामुळे चालतंय म्हणून...'; धनश्रीच्या आरोपांवर अखेर युजवेंद्र चहलकडून एक घाव दोन तुकडे