Women Centric Films: महिला-केंद्रित चित्रपटांनाही आता बॉक्स ऑफिसवर प्रेक्षकांचा दमदार प्रतिसाद मिळत आहे. एकेकाळी केवळ पुरुष कलाकारांच्या चित्रपटांवरच मोठ्या कमाईची अपेक्षा असायची. मात्र, गेल्या काही वर्षांत अभिनेत्रींच्या खांद्यावर उभे असलेले अनेक चित्रपट 100 कोटींच्या क्लबमध्ये दाखल झाले आहेत. नुकताच समंथा रुथ प्रभूचा 'मा इंटी बंगारम' हा चित्रपट प्रदर्शित झाला असून त्यानेही 100 कोटींचा टप्पा पार केला आहे. या निमित्ताने 100 कोटींच्या क्लबमध्ये स्थान मिळवणाऱ्या महिला-केंद्रित चित्रपटांवर एक नजर टाकूया.

Continues below advertisement

'द केरळ स्टोरी'

अदा शर्मा प्रमुख भूमिकेत असलेल्या 'द केरळ स्टोरी'ने भारतात 241.74 कोटी रुपयांचे नेट कलेक्शन केले. तर जगभरात या चित्रपटाने 302 कोटी रुपयांची कमाई केली. परदेशात चित्रपटाने 15.50 कोटींचा व्यवसाय केला. या चित्रपटात योगिता बिहानी, सिद्धी इदनानी आणि सोनिया बलानी यांच्याही महत्त्वाच्या भूमिका होत्या. या चित्रपटाचे दिग्दर्शन सुदीप्तो सेन यांनी केले होते.

'राजी'

आलिया भट्टच्या प्रमुख भूमिकेतील 'राजी'ने बॉक्स ऑफिसवर मोठे यश मिळवले. सॅकनिल्कच्या आकडेवारीनुसार, चित्रपटाने भारतात 123.74 कोटी रुपयांचे नेट कलेक्शन केले. तर जगभरात 195 कोटी रुपयांचा व्यवसाय केला. परदेशात चित्रपटाने 37 कोटी रुपयांची कमाई केली. या चित्रपटाचे दिग्दर्शन मेघना गुलजार यांनी केले होते.

Continues below advertisement

'गंगूबाई काठियावाडी'

संजय लीला भन्साळी दिग्दर्शित 'गंगूबाई काठियावाडी'मध्ये आलिया भट्ट मुख्य भूमिकेत झळकली होती. या चित्रपटाने जगभरात 211.50 कोटी रुपयांची कमाई केली. भारतात चित्रपटाचे ग्रॉस कलेक्शन 155.50 कोटी, तर नेट कलेक्शन 132.01 कोटी रुपये होते. परदेशी बाजारपेठेत चित्रपटाने 56 कोटी रुपयांचा गल्ला जमवला. या चित्रपटात अजय देवगणची विशेष भूमिका देखील होती.

'लोकाह: चॅप्टर 1'

कल्याणी प्रियदर्शन प्रमुख भूमिकेत असलेल्या 'लोकाह: चॅप्टर 1'ने जगभरात 303.86 कोटी रुपयांचा व्यवसाय केला. भारतात चित्रपटाचे ग्रॉस कलेक्शन 183.96 कोटी, तर नेट कलेक्शन 157.01 कोटी रुपये होते. परदेशात चित्रपटाने 119.90 कोटी रुपयांची कमाई केली. या चित्रपटाचे दिग्दर्शन डॉमिनिक अरुण यांनी केले असून अभिनेता दुलकर सलमान याने चित्रपटाची निर्मिती केली आहे. कल्याणी प्रियदर्शनच्या दमदार अभिनयासह तिच्या अ‍ॅक्शन भूमिकेचेही प्रेक्षकांनी भरभरून कौतुक केले.