The New Release On OTT: सिनेप्रेक्षकांसाठी फेब्रुवारी (February) महिना खूपच खास असणार आहे. या महिन्याच्या सुरुवातीलाच ओटीटी प्लॅटफॉर्मवर (OTT) अनेक दर्जेदार सिनेमे (Movies) आणि वेबसीरिज (Web Series) प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. यात 'द ग्रेट इंडियन मर्डर 2' (The Great Indian Murder 2) पासून ते तापसी पन्नूच्या (Taapsee Pannu) 'लूप लपेटा'पर्यंत (Loop Lapeta) अनेक दर्जेदार वेबसीरिज आणि सिनेमांचा समावेश आहे. 

द ग्रेट इंडियन मर्डर 2 (The Great Indian Murder 2) कुठे प्रदर्शित होणार? डिज्नी प्लस हॉटस्टारकधी प्रदर्शित होणार? 4 फेब्रुवारी

'द ग्रेट इंडियन मर्डर'चा पहिला भाग प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता. त्यानंतर प्रेक्षक या सीरिजच्या दुसऱ्या भागाची आतुरतेने वाट पाहत होते. अखेर 'द ग्रेट इंडियन मर्डर 2' (The Great Indian Murder 2) प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज आहे. 'द ग्रेट इंडियन मर्डर'चा दुसरा भाग प्रेक्षक 4 फेब्रुवारीपासून डिज्नी प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहू शकता. 

ब्लॅक पॅंथर 2 (Black Panther 2)कुठे प्रदर्शित होणार? डिज्नी प्लस हॉटस्टारकधी प्रदर्शित होणार? 11 नोव्हेंबर

मार्वल स्टुडिओजचा 'ब्लॅक पॅंथर' हा सिनेमा 11 नोव्हेंबर 2022 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. आता फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात हा सिनेमा ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. 1 फेब्रुवारीपासून प्रेक्षकांना हा सिनेमा डिज्नी प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहता येणार आहे. या सिनेमात प्रेक्षकांना अॅक्शनचा तडका पाहायला मिळणार आहे. 

वन कट टू कट (One Cut Two Cut) कुठे प्रदर्शित होणार? अॅमेझॉन प्राइम व्हिडीओकधी प्रदर्शित होणार? 3 फेब्रुवारी 

सिनेमागृहात धुमाकूळ घातल्यानंतर 'वन कट टू कट' हा सिनेमा प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज आहे. महिन्याच्या सुरुवातीला खळखळून हास्याचा आनंद लुटायचा असेल तर हा सिनेमा नक्की पाहा. अॅमेझॉन प्राइम व्हिडीओवर 3 फेब्रुवारीपासून प्रेक्षक हा सिनेमा पाहू शकतात. 

रॉकेट बॉईज (Rocket Boys 2)कुठे प्रदर्शित होणार? सोनी लिव्हकधी प्रदर्शित होणार? 4 फेब्रुवारी

'रॉकेट बॉईज' या वेबसीरिजच्या पहिल्या भागाच्या यशानंतर आता या सीरिजचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ही बायोपिक वेबसीरिज 4 फेब्रुवारीपासून प्रेक्षकांना सोनी लिव्हवर पाहता येणार आहे. डॉ. होमी भाभा आणि डॉ. विक्रम साराभाई यांच्या आयुष्यावर आधारित ही वेहसीरिज प्रेक्षकांना नक्कीच आवडेल. 

लूप लपेटा (Looop Lapeta)कुठे प्रदर्शित होणार? नेटफ्लिक्सकधी प्रदर्शित होणार? 4 फेब्रुवारी

बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नूचा (Taapsee Pannu) 'लूप लपेटा' (Looop Lapeta) हा सिनेमा फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा सिनेमा 4 फेब्रुवारीला नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात तापसीसोबत ताहीर भसीनदेखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे. हा सिनेमा 1998 मध्ये आलेल्या 'रन लोला रन' या जर्मन सिनेमाचा हिंदी रिमेक आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Entertainment News Live Updates 30 January : कर्नाटकात एका कॉन्सर्टदरम्यान कैलाश खेर यांच्यावर झाला हल्ला