February 2026 Bollywood Releases: फेब्रुवारी 2026 हा महिना हिंदी सिनेप्रेमींसाठी एक मेजवानी ठरणार आहे. जानेवारीमध्ये सनी देओल अभिनीत 'बॉर्डर 2' या चित्रपटाच्या ब्लॉकबस्टर यशानंतर, बॉलिवूड प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी नव्या कंटेंटसह सज्ज झालं आहे. कॉमेडी, अॅक्शन, रोमान्स आणि थ्रिलर - प्रत्येक शैलीतील सिनेमे फेब्रुवारीमध्ये मोठ्या पडद्यावर येतील. खास गोष्ट म्हणजे, फेब्रुवारी महिन्यात एकूण 8 हिंदी फिल्म्स रिलीज होणार आहेत. ज्यामध्ये 3 फिल्म्समध्ये थेट बॉक्स ऑफिस क्लॅश पाहायला मिळेल. जर तुम्हाला हिंदी सिनेमे पाहण्याची आवड असेल तर फेब्रुवारी महिना तुमच्यासाठी सर्वोत्तम राहणार आहे.

फेब्रुवारीच्या पहिल्याच आठवड्यात महाक्लॅश 

पहिल्या आठवड्यात कॉमेडी, ॲक्शन आणि रोमान्स असणारे तीन मोठे रिलीज पाहायला मिळतील. 'भाबीजी घर पर हैं!', 'पारो पिनाकी की कहानी' आणि 'वध 2'मध्येही टक्कर होणार आहे.

फेब्रुवारी 2026 मध्ये रिलीज होणाऱ्या हिंदी फिल्म्स

ओ'रोमियो (O'Romeo)

विशाल भारद्वाज दिग्दर्शित 'ओ'रोमियो' हा एक रोमँटिक अॅक्शन थ्रिलर सिनेमा आहे. शाहीद कपूर आणि तृप्ती डिमरी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. नाडियाडवाला ग्रँडसन एंटरटेनमेंटच्या बॅनरखाली निर्मित हा चित्रपट 13 फेब्रुवारी 2026 रोजी प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाच्या स्टारकास्टमध्ये तमन्ना भाटिया, नाना पाटेकर, दिशा पटानी, अविनाश तिवारी आणि विक्रांत मेस्सी यांचाही समावेश आहे.

अस्सी (Assi)

तापसी पन्नू अनुभव सिन्हासोबत 'अस्सी' या इन्व्हेस्टेटिव्ह थ्रिलर चित्रपटात पुन्हा एकत्र येत आहे. तापसी एका वकिलाची भूमिका साकारणार आहे. हा चित्रपट 20 फेब्रुवारी 2026 रोजी प्रदर्शित होणार आहे.

तू या मैं (Tu Yaa Main)

शनाया कपूर आणि विक्रांत मेस्सी स्टारर 'तू या मैं' हा चित्रपट 13 फेब्रुवारी 2026 रोजी प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर शाहीद कपूरच्या 'ओ'रोमियो' सिनेमाशी थेट स्पर्धा करेल.

दो दीवाने शहर में (Do Deewane Shaher Mein)

मृणाल ठाकूर आणि सिद्धांत चतुर्वेदी अभिनीत हा रोमँटिक ड्रामा चित्रपट 20 फेब्रुवारी 2026 रोजी प्रदर्शित होणार आहे. रवी उदयवर दिग्दर्शित हा चित्रपट तापसी पन्नूच्या 'अस्सी' चित्रपटाशी टक्कर देईल.

वध 2 (Vadh 2)

संजय मिश्रा आणि नीना गुप्ता यांच्या बहुचर्चित चित्रपट 'वध'चा सिक्वेल 'वध 2' 6 फेब्रुवारी 2026 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होईल. या क्राईम ड्रामामध्ये मानव विज आणि सौरभ सचदेवा देखील आहेत.

भाबीजी घर पर हैं! फन ऑन द रन (Bhabiji Ghar Par Hain! Fun on the Run)

लोकप्रिय टीव्ही शोवर आधारित हा विनोदी चित्रपट 6 फेब्रुवारी 2026 रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात आसिफ शेख, शुभांगी अत्रे, रोहिताश्व गौर यांच्यासह मुकेश तिवारी आणि रवी किशन यांच्या भूमिका आहेत.

पारो पिनाकी की कहाणी (Paro Pinaki Ki Kahani)

सामाजिक विषयावरील चित्रपट एका स्वच्छता कर्मचारी आणि भाजी विक्रेत्याची प्रेमकथा सांगतो. 'पारो पिनाकी की कहानी' देखील या तिहेरी संघर्षाचा भाग असेल, जो 6 फेब्रुवारी 2026 रोजी प्रदर्शित होईल.

बॉक्स ऑफिसवर 'महाक्लॅश'

फेब्रुवारी 2026 हा महिना बॉलिवूड चाहत्यांसाठी खूप खास असणार आहे. मोठ्या नावांचे चित्रपट प्रदर्शित होणार असले तरी बॉक्स ऑफिसवर महाक्लॅश होणार आहे.कोणता चित्रपट प्रेक्षकांची मनं जिंकणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.