Farzi 2: शाहिद कपूरची प्रमुख भूमिका असणारी ओटीटी विश्वातील प्रचंड लोकप्रीय झालेली वेबसिरिज फर्जीच्या दुसऱ्या सिझनची चाहत्यांना प्रचंड उत्सूकता आहे. फर्जी 2 कधी येणार? यात काय होणार? याची एकच चर्चा पहायला मिळतेय. दरम्यान, ओ रोमिओ या चित्रपटामुळे प्रचंड चर्चेत असलेल्या शाहिद कपूरने फर्जीच्या दुसऱ्या सिझनबद्दल चाहत्यांना एक मोठी हिंट दिलीय. फर्जी 2 लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ॲमेझॉन प्राईमवर अणारी ही वेब सिरिज बघता बघता प्रचंड लोकप्रीय झाली होती. आता तब्बल तीन वर्षांनी या वेबसिरिजचा दुसरा सिझन येणार आहे. तो कधी येणार याबाबत अभिनेता शाहिद कपूरने चाहत्यांना हिंट दिलीय.
फेब्रुवारी 2023 मध्ये फर्जीचा पहिला सिझन प्रदर्शित झालेला. ॲमेझोन प्राईमवर ही वेबसिरिज रिलीज झालेली. आता लवकरच या वेबसिरिजचा दुसरा सिझन लवकरच येणार आहे. गेल्या काही दिवसांपासून दिग्दर्शक राज अँड डीके यांनी सोशल मिडियावर काही दिवसांपूर्वी राऊंड 2 इन प्रोग्रेस असं कॅप्शन देत एक पोस्ट केलेली.चाहत्यांसमोर फर्जीच्या दुसऱ्या सिझनची रिलीज डेट समोर आली नाहीय.
शाहिद कपूरने दिली हिंट
अभिनेता शाहिद कपूर सध्या ओ रोमिओ या चित्रपटामुळे चांगलाच चर्चेत आहे. त्यानं नुकतंच सोशल मीडियावर आस्क मी एनिथिंग या सेशनखाली चाहत्यांच्या अनेक प्रश्नाची उत्तरं दिली. या सेशनदरम्यान, चाहत्यांनी फर्जी 2 कधी रिलीज होणार असा प्रश्न विचारला. त्यावर शाहिदने कमेंट करत वेबसिरिजबद्दल अपडेट दिली. त्यानं सांगितलं, पुढच्या शुक्रवारी तुम्हाला वेबसीरिजबद्दल सगळ्या अपडेट्स मिळतील.या वेबसिरिजसाठी चाहते प्रचंड उत्सूक आहेत.
पहिल्या सीझनप्रमाणेच ही सीरिज क्राइम थ्रिलर आणि ब्लॅक कॉमेडी यांचे मिश्रण असेल. सीझन 2 मध्येही तेच कलाकार असतील. यात “सनी” शाहिद कपूर, “मायकेल वेदनायगम” म्हणून विजय सेतुपती, “राशी खन्ना” म्हणून राशी खन्ना, भुवन अरोरा आणि के के मेनन यांचा समावेश आहे. हे सर्व कलाकार त्यांच्या मूळ भूमिकांमध्ये परततील. संपूर्ण टीम एकत्र येऊन कथेला आणखी रोमांचक बनवेल.