Bigg Boss 19 : बिग बॉस 19 आता संपलं आहे. गेल्या शंभर दिवसांपासून या शोला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. या सर्वात लोकप्रिय शोचा ग्रँड फिनाले काल (7 डिसेंबर 2025) पार पडला. या ट्रॉफीसाठी गौरव खन्ना तान्या मित्तल, प्रणित मोरे ,अमाल मलिक आणि फरहाणा भट्ट यांच्यात चुरशीची लढत झाली. या पर्वाचा विजेता गौरव खन्ना (Gaurav Khanna)ठरला. तर फरहाना भट्ट ही उपविजेती ठरली. मराठमोळा प्रणीत मोरे तिसऱ्या क्रमांकावर राहिला. अनुपमा स्टार गौरवनं 50 लाखांच्या रकमेसह बिगबॉसच्या ट्रॉफीवर नाव कोरलं. पण गौरवनं ट्रॉफी जिंकताच रनरअप ठरलेली फरहाना भट्ट(Farhana Bhatt)हिने गौरवच्या विजेतेपदावर प्रतिक्रिया दिलीय. गौरव खन्ना विजेता होण्याच्या लायकीचा नाही, असं ती बेधडकपणे म्हणालीय. ती म्हणाली "गौरवचं या शोमध्ये काहीही योगदान नाही. माझ्या मते तो विजेता होणं डिजर्व्ह करत नाही."

Continues below advertisement

Farhana Bhatt: गौरवने ट्रॉफी जिंकली मी मनं जिंकली ..

बिग बॉसच्या फिनाले मध्ये सलमान खानने विजेत्याचे नाव घोषित केलं. गौरव खंदाने 50 लाखांचा हित बिग बॉसच्या 19 व्या पर्वाची ट्रॉफी जिंकली. तर फरहाना भट्ट उपविजेती ठरली. फरहाणा भट्ट बिग बॉसच्या घरात आपल्या आक्रमक स्वभावासाठी ओळखले जात होती. शो मधून बाहेर पडल्यानंतर एका मुलाखतीत पापराजनशी संवाद साधताना ती म्हणाली होती जिंकणे हे तिचे कधीच ध्येय नव्हते. ती म्हणाली होती " माझी नजर ट्रॉफीवर कधीच नव्हती. त्याने ट्रॉफी जिंकली मी मनं जिंकली. ' हमको बिका सके वो जमाने में दम नही. हमसे जमाना खूद हैं हमसे जमाना नहीं"

Continues below advertisement

 

इंडिया फोरम्स ला दिलेल्या मुलाखतीत फरहाना भट्टने बेधडकपणे सांगितले की गौरव खन्ना बिग बॉस शोचा विजेता होणं डिझर्व करत नाही. तसं पाहिला गेलं तर गौरव खन्नाने या शोमध्ये काहीही योगदान केलेलं नाही. मला विचाराल तर तो विजेता होणं डिजर्व करत नाही. माहित नाही प्रेक्षक कुठल्या नजरेतून पाहत आहेत. त्याने कधीही स्पष्ट भूमिका घेतली नाही. तो कायम सेफ खेळला आहे.त्याने त्याच्या वागण्याने लोकांना कमी लेखले आहे, याविषयी मी अनेक वेळा हे बोललेय. मला वाटले नव्हते की तो विजेता होईल. मला वाटत नाही की तो एक पात्र विजेता आहे.

बिग बॉस 19 मधून फरहाना भट्टची एकूण कमाई

जरी फरहानाला बिग बॉस 19 मध्ये फर्स्ट रनर-अप म्हणून काहीही मिळाले नसले तरी, शोमध्ये असताना तिने बरीच कमाई केली. डेक्कन क्रॉनिकलमध्ये प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार, फरहानाला दर आठवड्याला 1-3 लाख रुपये मिळत होते. बिग बॉस 19 मधून तिची एकूण कमाई 45 लाख रुपये झाली.