farah khan reality show aunty kisko bola : फिल्ममेकर आणि कोरिओग्राफर फराह खान हिने तिचा नवा रिअॅलिटी शो ‘आंटी किसको बोला?’ यूट्यूबवर सुरू केला आहे. शुक्रवारी याचा पहिला एपिसोड रिलीज झाला. फराहने सांगितले की या शोमध्ये एकूण 8 एपिसोड असतील आणि प्रत्येक एपिसोडमधून एक कंटेस्टंट निवडला जाईल. फिनालेमध्ये हे आठ कंटेस्टंट्स एकमेकांशी स्पर्धा करतील. शोची सर्वात खास गोष्ट म्हणजे प्रत्येक एपिसोडला वेगळे जज असतील. (farah khan reality show aunty kisko bola)

सुनीता आहूजा आणि साजिद खान झाले पहिले जज

पहिल्या एपिसोडची सुरुवात गोविंदाची पत्नी सुनीता आहूजा आणि फराहचा भाऊ साजिद खान यांच्यासोबत झाली. दोन कंटेस्टंट्सनी परफॉर्मन्स केला होता, तेवढ्यात फराहचा कुक दिलीप स्टेजवर आला. येताच त्याने मजेत विचारले, "मॅडम, माझ्याशिवाय शो कसा करता? मला पण यायचं आहे." यावर सुनीता हसून म्हणाली, "साडी नेसशील?" दिलीपने "नाही" म्हणताच स्टेजवरून निघून गेला. (farah khan reality show aunty kisko bola)

साजिद खानचा मजेदार तिरकस टोला

दिलीप गेल्यानंतर साजिद खानने चेष्टा करत म्हटले, "आता वेळ येणार आहे, एक-दोन महिन्यांनी दिलीपच फराहला पगार देईल." त्यावर फराहनेही हसत उत्तर दिले, "हो शक्य आहे." (farah khan reality show aunty kisko bola)

मुलीच्या वेषात परतला दिलीप

थोड्या वेळाने अजून दोन कंटेस्टंट्स परफॉर्म केल्यानंतर दिलीप पुन्हा एकदा स्टेजवर आला, पण या वेळेस तो मुलीच्या वेषात होता. फराहने त्याला लगेच ओळखले आणि जाऊन त्याचा घुंगट उचलला. दिलीप म्हणाला, "मॅडम, तुम्ही माझ्याशिवाय शो सुरू केला म्हणून मी यात आलो." (farah khan reality show aunty kisko bola)

कपडे चोरून दिलीप पोहोचला स्टेजवर 

फराहने विचारले की हे मुलीचे कपडे कुठून आणलेस? त्यावर दिलीप मजेत म्हणाला, "कपडे तुमच्या रूममधून घेतले आणि खोटे केस सरच्या रूममधून." त्यानंतर दिलीप म्हणाला, "मॅडम, मलाही शो करू द्या ना." पण फराहने हसतच त्याला थांबवत म्हटले, "इतका वाईट डान्स करतोयस, इथून निघून जा. सॉरी ऑडियन्स." हे सगळं पूर्णपणे हशा-मस्करी आणि मजेत चालू होतं. (farah khan reality show aunty kisko bola)

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Last Stop Khanda Upcoming Marathi Movie: 'लास्ट स्टॉप खांदा' सिनेमातून उलगडणार प्रत्येकाच्या प्रेमाची गोष्ट; 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधल्या 'या' स्टारची लागली लॉटरी