Farah Khan cook dilip networth and salary : बॉलिवूडची डान्स टिचर आणि दिग्दर्शक फराह खानच्या यूट्यूब चॅनेलवर सर्वाधिक झळकणाऱ्या व्यक्तीचं नाव आहे दिलीप. दिलीप कधी काळी बिहारच्या दरभंगा जिल्ह्यातील एका छोट्या गावात शेतामध्ये मजुरी करायचा, आणि आज त्याचं नाव बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय कुक्समध्ये घेतलं जातं. चला पाहूया, दरभंग्याच्या दिलीपचा फराह खानच्या घरातील कुकपर्यंतचा प्रवास कसा झाला.

दिलीपचं पूर्ण नाव काय आहे?

दिलीपचं पूर्ण नाव आहे दिलीप मुखिया. ते दरभंगा जवळील एका छोट्या गावातून येतात. 2003 साली त्यांचा विवाह सविता नावाच्या मुलीशी झाला आणि त्यांना तीन मुलं आहेत.

मुंबईत कसे आले?

सुमारे 12 वर्षांपूर्वी दिलीप रोजगाराच्या शोधात मुंबईत आले. सुरुवातीला वेगवेगळ्या घरांमध्ये स्वयंपाकाचे काम केलं. हळूहळू नशिबाने कलाटणी घेतली आणि त्यांचा प्रवास थेट फराह खानच्या घरापर्यंत पोहोचला. गेले 10 वर्ष ते फराहसोबत काम करत आहेत. आता ते केवळ कुक नाहीत, तर तिच्या घराचा एक अविभाज्य भाग बनले आहेत.

फराह खानसोबतचं नातं

फराहने दिलीपला फक्त नोकरी दिली नाही, तर त्यांना कुटुंबासारखं वागवलं. दिलीप सेलिब्रिटीजच्या घरी फराहसोबत जातात, शूटिंगला सहभागी होतात आणि मजेदार अंदाजात गप्पा मारतात. फराह गंमतीत म्हणते, "मी एक मॉन्स्टर तयार केलंय" आणि दिलीपही हसत उत्तर देतात, "मी अजूनही मॅडमला शिकवत आहे."

यूट्यूबवर स्टार कसे बनले?

सुमारे एक वर्षापूर्वी फराह खानने तिचा यूट्यूब चॅनेल सुरू केला. ती सेलिब्रिटींच्या घरी जाऊन विविध पदार्थ बनवते. तिच्यासोबत दिलीपही असतात. दिलीपच्या बोलण्याचा अंदाज, त्यांचे विनोदी संवाद आणि बिनधास्त उत्तरं देण्याची शैली प्रेक्षकांच्या मनात घर करून गेली. "मॅडमला शिकवू नका, मला येतं" सारखे डायलॉग्स सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले.

दिलीपची कमाई आणि जीवनशैली

इकोनॉमिक टाइम्सच्या माहितीनुसार, दिलीप आता दर महिन्याला 1 लाख रुपयांहून अधिक कमावतो. फराहने तिच्या व्ह्लॉगमध्ये गंमतीत सांगितलं होतं की, दिलीपने 1 लाख रुपयांची अ‍ॅक्टिंगची ऑफर नाकारली कारण आता त्याच्यासाठी 1 लाख "कमी" आहेत. आता त्याच्याकडे BMW कार आहे आणि तो म्हणतो, "आता आणखी महागडी गाडी घ्यायची आहे."

बिहारमध्ये बांधतोय सहा खोल्यांचा बंगला

दिलीपने आपल्या गावात तीन मजली, सहा खोल्यांचं मोठं घर बांधलं आहे. अजून बांधकाम पूर्ण झालेलं नाही – स्विमिंग पूल बनवायचं बाकी आहे. सध्या त्यांची पत्नी आणि मुलं तिथेच राहतात.

इतर महत्वाच्या बातम्या 

1 हजार सिनेमांमध्ये काम, लोकप्रिय आजी आई बनू शकली नाही, मुलगी दत्तक घेतली, आता नातही झाली हिरोईन