Pirates Of the Caribbean actor Tamayo Perry Dies :  'पायरेट्स ऑफ द कॅरिबियन' या सुपरहिट हॉलिवूड चित्रपटातील अभिनेता तामायो पेरी याचे हवाई येथे निधन झाले. तमायोच्या वयाच्या 49 व्या वर्षी निधन झाल्याने हॉलिवूड इंडस्ट्रीला मोठा धक्का बसला आहे. तमायो पेरीने अनेक हॉलिवूड चित्रपट केले आहेत.  तमायोवर 23 जून रोजी शार्कने हल्ला होता. या हल्ल्यात जखमी झालेल्या तमायोवर उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यान त्याची प्राणज्योत मालवली. 


शार्कच्या हल्ल्यात जखमी झाला होता तमायो पेरी


'हिंदुस्तान टाईम्स'ने 'स्काय न्यूज'चा हवाला देत  अभिनेता तमायो पेरी याच्या मृत्यूचे वृत्त दिले आहे. 23 जून रोजी शार्कच्या हल्ल्यानंतर तामायो पेरी याला होनोलुलू मधील रुग्णालयात आपत्कालीन स्थितीत दाखल करण्यात आले होते. तमायो पेरी हा समुद्री सुरक्षा रक्षक आणि सर्फिंग प्रशिक्षकासोबत गोट बेटावर होता. तमायोने सुरक्षेबाबतची सगळी काळजी घेतली असतानाही शार्कने त्याच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. 


तमायो पेरीला तातडीने जेट स्कायने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तमायोचे रुग्णालयात निधन झाले. हिंदुस्तान टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार तमायोच्या शरीरावर शार्क माशाने अनेक ठिकाणी चावा घेतला होता. यामुळे तमायो गंभीर जखमी झाला. त्या कारणाने अभिनेत्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर आता त्या ठिकाणच्या बीचवर बंदी घालण्यात आली आहे. 






तमायोला होती सर्फिंगची आवड






वृत्तसंस्थांनी दिलेल्या वृ्त्तानुसार, तमायोने वयाच्या 12 व्या वर्षी सर्फिंगला सुरुवात केली होती. होनोलुलू एर्मजन्सी सर्व्हिस डिपोर्टमेंटचे अधिकारी शायनी एनराईट यांनी सांगितले की, जुलै 2016 मध्ये तमायोने त्यांच्यासोबत काम करण्यास सुरुवात केली. मागील काही वर्षांपासून तमायो या ठिकाणी काम करत होता. त्याशिवाय, हॉलिवूड चित्रपटातही काम करत होता. तमायोने पायरेट्स ऑफ द कॅरेबियनशिवाय,  ब्लू क्रश सारख्या चित्रपटात काम केले आहे.