Famous Singer Drinks Sperm Cocktail: सध्या जगभरात आणि बॉलिवूडमध्येही (Bollywood) अनेक प्रसिद्ध गायक, गायिका (Famous Singer) आहे. यापैकी काहींचे आवाज आपल्याला थिरकायला भाग पाडतात, तर काहींचे आवाज अगदी मंत्रमुग्ध करतात. गायकांना आपला आवाज फार जपावा लागतो. अनेकजण थंड खाणं-पिणं सोडतात. तर, देवाच्या वरदानाप्रमाणे असलेला गोड गळा जपण्यासाठी अनेकजण स्ट्रिक्ट डाएट पाळतात. पण, अशीच एक प्रसिद्ध गायिका आहे, जी आपला आवाज जपण्यासाठी असं काही करते की, ते ऐकून तुम्हाला सर्वात आधी धक्का तर बसेलच, पण त्यासोबतच किळसही येईल. गायिकेनं आपला आवाज जपण्यासाठी घेत असलेल्या सिक्रेट ड्रिंकचा खुलासा करताच, सर्वत्र खळबळ माजली आहे. 

प्रसिद्ध अमेरिकन गायिका जेसिका सिम्पसन (Jessica Simpson) ही तिचा आवाज जपण्यासाठी एक सिक्रेट ड्रिंक घेते, यासंदर्भात तिनं स्वतः खुलासा केला आहे. 44 वर्षांची 'स्वीट किसेस' आणि 'इन द स्किन' फेम गायिकेनं दावा केला आहे की, तिला तिच्या वोकल कॉर्ड जपण्यासाठी चिनी हर्बल कॉकटेल प्यायचं आहे. धक्कादायक बाब म्हणजे, या चिनी हर्बल कॉकटेलमध्ये सापाचे स्पर्म्स (Snake Sperm) असतात. पुढे बोलताना जेसिकानं असंही सांगितलं आहे की, या हर्बल ड्रिंकबाबत तिला तिच्या वोकल कोचनं माहिती दिली होती. 

जेसिका सिम्पसननं इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तिनं या चिनी हर्बल ड्रिंकबाबत खुलासा केला आहे. या पेयामध्ये सापाचं वीर्य देखील असल्याचं गायिकनं सांगितलं आहे. गायिकेनं केलेलं वक्तव्य आणि शेअर केलेला व्हिडीओ पाहून तिच्या चाहत्यांना धक्का बसला. जेसिका सिम्पसननं असंही म्हटलं आहे की, तिला यासंदर्भात काहीच माहीत नव्हतं. तसेच, हर्बल ड्रिंकमध्ये सापाचे स्पर्म्स मिसळलेले असतात, यासंदर्भातही तिला फारशी माहिती नव्हती. पण जेव्हा तिच्या एका मैत्रिणीनं तिला त्यातील घटकांची यादी दाखवली, तेव्हा तिलाही धक्का बसला.

जेसिकानं सापाच्या स्पर्मची तुलना मधाशी केली

व्हिडीओ क्लिपमध्ये, जेसिका तिच्या मैत्रिणींबद्दल सांगताना म्हणते की, "ते विचारत होते, 'तुम्ही काय पीत आहात?' ज्याला मी उत्तर दिलं की, हे एखाद्या चिनी औषधी वनस्पतीसारखं काहीतरी आहे. माझ्या व्होकल कोचनं मला हे पेय पिण्याचा सल्ला दिला. दरम्यान, त्यात सापाचे स्पर्म्स असल्याचं कळाल्यावर जेसिकाला काळजी वाटली नाही. उलट तिनं या पेयाची तुलना मधाशी केली."

"उत्तम वोकल हवं असेल तर, सापाचं वीर्य प्यावं लागेल"

जेसिका म्हणाली की, "जर तुला उत्तम वोकल हवं असेल तर, तुम्हाला सापाचे स्पर्म्स प्यावे लागतील." अशातच गायिकेनं हा व्हिडीओ शेअर करताना एक मायक्रोफोन इमोजीसोबतच साप आणि टेस्ट ट्यूब इमोजी कॅप्शनमध्ये टाकलं आहे. 

जेसिकाच्या पोस्टवर युजर्सनी लिहिलंय, "निष्काळजीपण, घृणास्पद... किळसवाणं आहे हे सगळं" 

एका युजरनं जेसिका सिम्पसनच्या पोस्टवर कमेंट करताना लिहिलंय की, "मजेशीर, तरीसुद्धा निष्काळजीपणाचं लक्षण आहे..." आणखी एका युजरनं लिहिलंय की, 'नया चिकन ऑफ द सी मोमेंट है।'. तिसऱ्या युजरनं लिहिलंय की, "हाहाहा, ही तिच जेस आहे, जिला आम्ही ओळखतो आणि जिच्यावर आम्ही प्रेम करतो", एका युजरनं लिहिलंय की, "हे फारच विचित्र आहे, खूप किळस येत आहे..."

किम कार्दशियन आणि जेनिफर एनिस्टनसुद्धा घेतायत 'स्पर्म'चा आसरा 

मीडिया रिपोर्ट्सनुसार, जेसिका सिम्पसन सापाच्या स्पर्मचं सेवन करणारी पहिली सेलिब्रिटी नाही. TMZ च्या रिपोर्टनुसार, बऱ्याच काळापासून किम कार्दशियन आणि जेनिफर एनिस्टन यांसारखे सेलिब्रिटीही आपल्या चमकदार आणि तरुण दिसणाऱ्या त्वचेसाठी सॅल्मनच्या स्पर्मचा आधार घेतात. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Neeraj Grover Case: प्रसिद्ध अभिनेत्रीनं होणाऱ्या नवऱ्यासोबत रचला प्रियकराच्या हत्येचा कट; मृतदेहासमोरच दोघांचा सेXX, 300 तुकडे करुन फेकले